AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीनगरमधून मुली-महिला बेपत्ता होण्यामागे MIM चा हात? शिंदे सेनेच्या शिलेदाराचा सनसनाटी आरोप, राज्यात एकच खळबळ

Nida Khan- MIM: एमएमआय पक्ष काल निदा खानच्या समर्थनार्थ खुल्यापणाने समोर आला. निदा खान ही छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपलेली होती. पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या मुद्दावरुन राजकारण तापलं आहे. शिवसेना-भाजप विरुद्ध एमआयएम असा सामना सुरू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून मुली-महिला बेपत्ता होण्यामागे MIM चा हात? शिंदे सेनेच्या शिलेदाराचा सनसनाटी आरोप, राज्यात एकच खळबळ
निदा खान, मतीन पटेल, इम्तियाज जलील, ओवेसी, राजेंद्र जंजाळImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 10, 2026 | 1:53 PM
Share

Rajendra Janjal on MIM- Matin Patel: टीसीएस आयटी कंपनीची माजी कर्मचारी आणि धर्मांतरण तसेच लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली. नारेगाव परिसरात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून तिला अटक करण्यात आली. हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. एमआयएम निदा खान निर्दोष असल्याचे दावा करत उघडपणे समर्थनात आल्याचे दिसले. तर एमआयएमच्या भूमिकेवर हिंदुत्वादी संघटना, भाजप आणि शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. तर आता शहरातून मुली आणि महिला गायब होण्यामागे एमआयएमचा हात तर नाही ना? असा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उप महापौर राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना नोटीस

मतीन पटेल याचे घर कार्यालय आणि निदा खान हिला ज्या ठिकाणी लपवले होते, ते बांधकाम अवैध आणि अनधिकृत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कायद्या नुसार महापालिका त्यावर कारवाई करणार आहे, आणि तशी नोटीस मतीन पटेल याच्या घरावर नोटीस लावलेली आहे. आणि मतीन पटेल याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. चौथ्या दिवशी मतीन पटेल याच्या घरावर आणि कार्यालयावर आणि ज्या ठिकाणी निदा खान हिला लपवण्यात आले ते बांधकाम पाडण्यात येईल

मतीन पटेल यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार

नगरसेवक मातीन पटेल यांच्यावर काय कारवाई होणार याविषयी राजेंद्र जंजाळ यांनी महापालिका अधिनियमांचा आधार घेतला. महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1947 ( 10 ड ) मध्ये स्पष्ट केलेले आहे की, एखादा नगरसेवक किंवा त्याचे आई, वडील, बहीण, भाऊ या पैकी कोणीही अनधिकृत बांधकाम केले असेल, त्याचे नगरसेवक पद निष्काशीत होऊ शकते. हा कायदा आहे आणि नियम आहे आणि हे 100 टक्के होणार असा दावा जंजाळ यांनी केला.

पुरावे नष्ट करण्याचे काम

निदा खान प्रकरण दिसते तेव्हढे सोपे नाही, पोलिसांनी त्यात नऊ एफआयआर नोंदवलेले आहे. निदा खानला 40 दिवस छत्रपती संभाजीनगर मध्ये आणून पोलिसांपासून दूर ठेवले आणि या 40 दिवसात अनेक पुरावे नष्ट झाले असतील. आणि असे कोणतेही कृत्य करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. ओवेसी आणि जलील यांनी निदा खान आणि मतीन पटेल यांची पाठराखण केली. एमआयएमची भूमिका संशयास्पद आहे आणि एमआयएमने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केली.

संभाजीनगरमधून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात?

जबरदस्तीने केलेले धर्मांतर आणि लैंगिग शोषण, आणि असे आरोप असणार्‍यांना आश्रय देणे, ही जर एमआयएमची भूमिका असेल आणि छत्रपती संभाजीनगरमधून अनेक अल्पवयीन मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. अनेक पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल आहेत पण त्यांचा शोध लागलेला नाही, मग याच्या मागे एमआयएम आहे का? याची चौकशी केली गेली पाहिजे आणि एमआयएमने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे मोठे वक्तव्य जंजाळ यांनी केले.

आम्ही बोलायला गेलो तर एमआयएमचे नगर सेवक विकासाची भाषा करतात. परंतु एमआयएमचे नगरसेवक निदा खानला आश्रय देण्यापूरते मर्यादित नाही. मतीन पटेलच्या मोबाईल मध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण आहे, असे चित्रीकरण करून ब्लॅक मेल केलेल्या तक्रारी पोलिसांकडे दिलेल्या आहेत. एमआयएमच्या एका नगरसेवकावर 307 चा गुन्हा आहे, तर एक नगरसेवक मुंबईच्या ड्रग माफियासोबत पार्टनरशिप आहे. असे अनेक गुन्हे असलेले लोक एमआयएम मध्ये काम करतात. एमआयएम गुन्हेगारांना आपली पक्षात घेतात आणि त्याला तिकीट देतात. मागच्या वेळीही महापालिका मध्ये एमआयएमचे गुन्हेगार नगरसेवक सभागृहात होते. एमआयएम गुंड आणि विघातक कृत्य करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे, असा आरोप उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?