Manoj Jarange : गनिमी काव्याने मुंबई वेठीस धरणार? 29 ऑगस्टसाठी मनोज जरांगेंचा प्लॅन काय? पोलीस अलर्ट मोडवर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील गनिमी काव्याने मुंबई वेठीस धरणार का? अशी चर्चा रंगली आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांनी परवाच मराठा अभ्यासकांची बैठक घेतली. त्यात त्यांचा सरकारविरोधातील रोष दिसून आला. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या या घडामोडींमुळे पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या दहा दिवसात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जरांगे पाटील गनिमी काव्याने मुंबई वेठीस धरणार का? अशी चर्चा रंगली आहे. यापूर्वीच त्यांनी वर्षा बंगल्याची गारेगार हवा खाण्याचे संकेत दिले होते. यामुळे 29 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा अभ्यासकांची त्यांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली. त्यांच्याशी जीआरमधील त्रुटीवर चर्चा केली. आता अवघ्या दहा दिवसांवर आंदोलन येऊन ठेपल्याने पोलीस अलर्ट मोडवर आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा रद्द
मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर वीस तारखेपासून मराठवाडा दौरा होणार होता. या दौर्याची आखणी देखील करण्यात आली होती मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मराठवाड्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट च्या आंदोलनापूर्वी अंतरवाली सराटीत गोदापट्ट्यातील गावांची बैठक होणार आहे. त्यासाठी ते मराठवाडा दौरा काढणार होते. पण प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी मराठवाडा दौरा रद्द केल्याचे समजते.
आझाद पोलिसांकडे परवानगी अर्ज
यानंतर 29 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनाला सुरुवात होईल. हे आंदोलन अंतरवाली सराटीत होणार की मुंबईत हे अजून स्पष्ट नाही दरम्यान आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनासाठीच्या परवानगी करिता अर्ज देण्यात आलेला आहे. यामुळे अंतरवाली सराटीऐवजी मुंबई हे आरक्षणासाठी रणसंग्राम ठरेल की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला होता. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जरांगे पाटील हे गनिमी कावा वापरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दहा दिवसात काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाहीतर सरकार पाडतो
आतापर्यंत 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे सरकारनेच सांगितले आहे. यामुळे जेवढ्या नोंदी सापडल्या आहेत. तेवढी कुणबी प्रमाणपत्रं वाटप करा , नसता सरकार पाडतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. उपचारासाठी जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पत्रकारांशी आज संवास साधताना 28 ऑगस्टपर्यंत सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी वेळ आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार असल्याचे ते म्हणाले. आता मराठवाडा आणि विदर्भात गाव बैठका घेण्यात येणार असल्याचे समजते. 20 ते 25 ऑगस्ट या दरम्यान गोदापट्ट्यात गाव बैठका घेण्यात येणार आहे. त्यांनी ओबीसी नेत्यांकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला आहे.