AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव

मोठी बातमी समोर येत आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव
| Updated on: Feb 24, 2025 | 2:55 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं, या साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले आहेत, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा असा देखील ठराव घेण्यात आला. धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, तर दुसरीकडे आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून वारवांर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.

दरम्यान दुसरीकडे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे, त्यांनी याबाबतची तक्रार ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर आता न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, याबाबत आता 15 मार्च रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?