राष्ट्रवादीतील काही जण संपर्कात… शिंदे सेनेच्या या बड्या नेत्याने टाकला बॉम्ब…. राजकीय समीकरणं बदलणार?
Ajit Pawar NCP- Eknath Shinde Shivsena: अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरू असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यातच नाराज नेते शरद पवार यांच्या भेटीलाही गेल्याचे समजते. तर काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा बडा दावा करण्यात आला आहे. महायुतीतच हा दुसरा घरोबा करण्यात येईल का? असा सवाल विचारल्या जात आहे.

ज्ञानेश्वर लोंढे /प्रतिनिधी : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट (Ajit Pawar NCP- Eknath Shinde Shivsena) यांनी केला. त्यांच्या या राजकीय बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहे. यातील 22 आमदारांनी आणि बड्या नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी मंत्री शिरसाट यांनी हा दावा केला आहे. राज्यात राजकीय समीकरणं बदलणार का? अशी चर्चा होत आहे.
छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेसेनेचीच
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी तालुका निहाय बैठक घ्यावी, यासाठी कार्यक्रम दिलेला आहे. यासर्वांचे नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे करीत आहेत. प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्याचा सत्र सुरू आहे. पुढील लोकसभा, विधानसभेची तयारी देखील होते. BLO यांना ट्रेनिंग आणि बांधणी होते असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर भाजप दावा करीत आहे. मात्र ही जागा शिवसेनेचे होती, आहे व राहणार असं आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं आहे. ही जागा आम्ही सोडणार नाही, अशी रोखठोक भूमिका शिरसाट यांनी घेतली. भाजपाचा संख्याबळ जास्त असू द्या. दुप्पट आहे आणि तिप्पट असू द्या. वजाबाकी करणे भाजपाचे काम आहे. वरिष्ठ या जागेविषयी निर्णय घेतील, असे शिरसाट म्हणाले.
राहुल गांधी यांचं वक्तव्य वादग्रस्त
तर मेलोडी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी नेहमी काही तरी वादग्रस्त वक्तव्य करतात, मनमोहन सिंह जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांचा अपमान संसदेत केला होता. देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्री बाबत काय बोलले पाहिजे? हा राहुल गांधी यांचा स्वभाव झाला आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.
कॉक्रोज पार्टीविषयी मोठे वक्तव्य
मुळात न्यायमूर्ती सारख्या माणसाने सर्व सामान्य माणसाला डिवचणे योग्य नाही. भारताला स्वातंत्र्यात हाच युवक होता, तुमच्या राजकीय पक्षासाठी या युवकांचा वापर करतात आणि काम संपल्यावर यांच्याशी संबंध नाही असे म्हटले जाते आणि याच युवकांना कॉक्रोज म्हणणे गैर आहे. कॉक्रोज पार्टी चे फॉलोअर्स उद्रेक दाखवत आहे. प्रत्येक युवक दाखवत आहे, असे मोठे वक्तव्य मंत्री शिरसाट यांनी केले आहे.
दादांच्या राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेंना महत्वाचे स्थान मिळणार या प्रश्नावर मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय बॉम्ब टाकला. दादांच्या राष्ट्रवादीतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला. कुणाच्या नेतृत्वात काम करायचे याबाबत त्यांच्यात संभ्रम आहे. एवढे मात्र नक्की आहे की त्या पक्षात सर्व काही अलबेल नाही एवढे नक्की, असेही वक्तव्य शिरसाट यांनी केले.