AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: फडणवीस, तुमची भाजप पुढच्या वेळी सत्ता… उद्धव ठाकरे यांचे मोठे भाकीत, तुमसे ना हो पाएगा कार्यक्रमातून जबरी टीका

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधून सरकारला ललकारले. त्यांनी एक मोठे भाकीत ही केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने तुमसे ना हो पाऐगा या आंदोलनानिमित्त ते शहरात आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर मोठी टीका केली.

Uddhav Thackeray: फडणवीस, तुमची भाजप पुढच्या वेळी सत्ता... उद्धव ठाकरे यांचे मोठे भाकीत, तुमसे ना हो पाएगा कार्यक्रमातून जबरी टीका
उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 17, 2026 | 2:12 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठे भाकीत केले. देवेंद्र फडणवीस, तुमची भाजप पुढच्या वेळी सत्ता पाहू शकणार नाही, असा मोठा दावा ठाकरे यांनी केला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि तुमसे ना हो पाऐगा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सरकारवर चौफेर टीका केली. सरकारने मराठवाड्यात तात्काल दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यांनी मराठवाड्यातील फुटलेल्या खासदारांना खुले आव्हान दिले. काय म्हणाले ठाकरे?

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

आज १७ सप्टेंबर आहे. दोन ते तीन गोष्टी एकत्र आहेत. एकतर मराठावाडा मुक्ती दिन आहे. दुसरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. तो कसा करायचा हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. सध्या आपण जे काही मराठवाड्यासाठी जे आंदोलन करतो आहोत. वाचा फोडत आहोत. आपले दयाळू पंतप्रधान माफ करतील. आज माझ्या आजोबांचा प्रबोधन ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. मराठवाड्यातील बोर्ड, होर्डिंग पाहून कुणालाही वाटेल की इथं आनंदी आनंद आहे असे वाटेल. पण मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. मुख्यमंत्री यांनी आपल्या आंदोलनावर टीका केल्याचे मी ऐकले. मराठवाडा मुक्ती दिनाला न येता उपमुख्यमंत्री आणि पुरस्कारश्री, स्वतःच स्वतःला पुरस्कार खरेदी करणारे एकनाथ शिंदे गुजरातला गेले. या व्यथा, वेदना त्यांना कळणार नाही. येथील लोकांना या यातना माहिती आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये फौजा घुसवा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठवाड्यातील गद्दारांसह सर्व खासदार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मराठवाड्याच्या व्यथा छातीठोकपणे मांडाव्यात. ते या व्यथा पंतप्रधानांसमोर मांडू शकतात का? त्यांच्यात हिंमत नाही म्हणून मराठवाड्यावर अन्याय होत आहे. मराठवाडा हा लढणारा आहे. निजामसोबत तो लढला. 17 सप्टेंबरला गोविंदभाई श्रॉफ आणि मान्यवरांनी लढा दिला. मराठवाडा राज्यात आल्यानंतर शेतकरी आत्महत्या या 75 वर्षात सर्वाधिक झाल्या. त्यासाठी मराठावाडा या देशात आला का? ऑपरेशन पोलोअतंर्गत हैदराबाद संस्थानात सरदार वल्लभभाई पटेल यांनी फौजा झुकवल्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये फौजा घुसवण्याची यांची हिम्मत आहे का? पश्चिम बंगालमध्ये यांनी निवडणूक जिंकण्यासाठी फौजा घुसवल्या असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

आम्ही पंचनामे झाले की नाही ते तपासू

आज मराठवाड्यातील परिस्थितीवर शिवसेनेचा आमदार, खासदार, नेते हे आवाज उठवत आहेत. मी स्वतः तुमच्यासोबत आहे. आज मी तुम्हाला शब्द देत आहे. 5 ऑक्टोबरपासून यांचे पंचनामे सुरू होत आहे. करूद्यात. पण 5 तारखेनंतर आम्ही सर्वच जण पंचनामे व्यवस्थित होत आहेत की नाही हे तापसणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही सगळीकडे जाणार. शिवसैनिकांनी जिथे जिथे पंचनामे होत आहेत, तिथे जातीने हजर राहा. पंचनामा बरोबर होत आहे की नाही हे तपासा, शेतकऱ्यांना मदत मिळून द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

भाजपवर मोठी टीका

भाजप ही सत्ता पिपासू आहे. ते त्यासाठी वाटेल ते करतील. त्यांनी देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद लावले. राज्यातही जाती जातीत भांडणं लावली. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर, कुणबी, आदिवासी सर्वांना पेटवलं. आदिवासी लोकं तिकडं आंदोलन करत आहेत. जरांगे आज बहुधा मुंबईला जाणार होते. एक माणूस स्वतः चे प्राण पणाला लावून लढत आहे. तर दुसरा माणूस हा लंडनमध्ये जाऊन पुरस्कार घेत आहे. महाराष्ट्राला हात जोडून नव्हे सांष्टांग दंडवत घालून विनंती करत आहे की, जरांगे पाटील, ओबीसी, धनगर, आदिवासी यांना विनंती करत आहे की, या सरकारचा डाव हाणून पाडा. हे कोपराला गूळ लावत आहे. ते आपल्याला लढवत आहेत. तुमच्या जीवाशी खेळत आहेत. आपण सर्व महाराष्ट्राची लेकरं म्हणून एकत्र येऊयात. एकजुटीने आपण लढलो तर कोण तुम्हाला न्याय देत नाही ते मी बघतो. जातीपातीत विखुरले, जातीपातीचे विष आपल्यात कालवत हे सत्ता उपभोगत आहेत. किती काळ भोगणार? आता आपण महाराष्ट्र पिंजून काढू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच