AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डियर अहो, मी प्रामाणिकच होते, आता माझ्या मृतदेहाला गच्च मिठी मारूनच चितेवर ठेवा… जीवन संपवलेल्या महिला डॉक्टरच्या चिठ्ठीत काय म्हटलं?

प्रत्येक सुखी संसारामध्ये तिळाएवढा संशय आला तर त्या संसाराची राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही. संशयाचं भूत एकदा मनात शिरल्यावर संसार तर टिकत नाहीच पण कोणा एकाच्या जीवावरही बेततं. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. एका डॉक्टर पत्नीने लग्नाला अवघे पाच महिने झाले असताना पतीच्या या संशय घेण्याच्या वृत्तीला आणि त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. मृत्यूआधी तिने एक सातपाणी नोट लिहिली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तिने जिवंतपणी काय यातना भोगल्या असतील हे दिसून येतं.

डियर अहो, मी प्रामाणिकच होते, आता माझ्या मृतदेहाला गच्च मिठी मारूनच चितेवर ठेवा... जीवन संपवलेल्या महिला डॉक्टरच्या चिठ्ठीत काय म्हटलं?
| Updated on: Aug 30, 2024 | 1:21 PM
Share

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील एक घटनेने खळबळ उडाली. कन्नड तालुक्यातील करजंखेडा येथील ही घटना आहे. पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या 26 वर्षीय डॉक्टर पत्नीने गळफास घेत जीवन संपवलं. पतीच्या संशयखोर स्वभावाला ती कंटाळली आणि टोकाचा निर्णय घेतला. मृत डॉक्टर पत्नीचे नाव प्रतिक्षा गवारे असे होते. मृत्यूआधी तिने सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटने सर्वच सुन्न झाले आहेत. पोलिसांनी आरोपी पती प्रीतम गवारेवर हुंड्यासाठी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

सात पानांच्या या चिठ्ठीमध्ये पतीने तिला कशा प्रकारे मानिसक त्रास आणि छळ केला हे सांगितलं आहे. त्याला संशयामुळे तिने अनेक गोष्टी बदलल्या. मात्र तरीही तो तिला छळतच राहिला. एकंदिरत हे पत्र पाहता प्रतिक्षा भुसारे यांची मानसिक स्थिती काय झाली असेल याचा अंदाज येऊ शकतो. इतकं सर्व करूनही आरोपी पतीचे मन भरले नाही. शेवटी तिने आपलं जीवन संपवलं.

डिअर अहो,

खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.

माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलंत त्याचं वाईट वाटलं. सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.

तुमचीच –

प्रतीक्षा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.