AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : आम्ही हिंदू आहोत पण…‘हिंदी’च्या सक्तीला मनसेचा विरोध कायम, संदीप देशपांडेंच ट्विट चर्चेत

हे. महाराष्ट्राच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाणार आहे. मनसेने या निर्णयाला विरोध दर्शवला असून संदीप देशपांडे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे.

MNS :  आम्ही हिंदू आहोत पण...‘हिंदी’च्या सक्तीला मनसेचा विरोध कायम, संदीप देशपांडेंच ट्विट चर्चेत
हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध कायमImage Credit source: social media
| Updated on: Apr 18, 2025 | 8:00 AM
Share

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाणार आहे. मात्र यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली असून मनसेने मात्र या निर्णयाल सख्त विरोध दर्शवला आहे. ‘ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही,’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनीही एक ट्विट केलं असून ते चांगलंच चर्चेत आलं आहे.

काय आहे संदीप देशपांडेंचं ट्विट ?

आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही.. असं ट्विट मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलं असून त्यासोबत त्यांनी राज ठाकरेंचा एका फोटोही शेअर केला आहे. शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर देशपांडेंचं हे ट्विट चर्चेत आलं आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे. मात्र हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर देशपांडे यांनीही हे ट्विट केलं असून मनसेचा हिंदीच्या सक्तीला विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे.

मनसेकडून बॅनरबाजी

याच निर्णयाचा विरोध करत मनसेकडून शिवसेना भवनाच्या चौकातही काही बॅनर लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनीही एका पोस्टकार्डचा बॅनर त्याच भागात लावला आहे. मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांना उद्देशून लिहीलेलं हे पोस्टकार्ड बॅनर आहे.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी,  शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

सुरेश भटांच्या या ओळी या पोस्टकार्ड बॅनरवर झळकत आहेत.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्रात यंदाच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाणार आहे. मात्र या निर्णयाला अनेकांचा विरोध असून मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘ मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही,’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी