विशाल पाटलांचं विमान गुजरातला…; सांगलीच्या भूमीतून संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल

| Updated on: Apr 06, 2024 | 12:35 PM

Sanjay Raut on Vishal Patil and Loksabha Election 2024 : सांगलीच्या भूमीतून संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल... म्हणाले, विशाल पाटलांचं विमान गुजरातला... संजय राऊत काय म्हणाले? सांगलीच्या जागेवर कोण लढणार? भाजपवर निशाणा साधताना काय म्हणाले? वाचा सविस्तर...

विशाल पाटलांचं विमान गुजरातला...; सांगलीच्या भूमीतून संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल
Follow us on

सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाने डबल मबाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. पण सांगली हा आमचा गड आहे, इथे आमचाच उमेदवार द्या, अशी भूमिका सांगली जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. विशाल पाटील हे सांगलीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीत आहेत. तिथे पक्षातील वरिष्ठांशी सांगलीच्या जागेवर चर्चा करत आहेत. काँग्रेसकडून वारंवार सांगलीच्या जागेवर दावा केला जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे.

सांगलीच्या जागेवरून राऊत काय म्हणाले?

विशाल पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. विश्वजीत कदम हे पायलट आहेत, हे विशाल पाटील यांनी वक्तव्य 10 मार्च रोजी बुरली येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. विशाल पाटील यांचे कोणी तर पायलट आहेत. पायलट नेईल तिथे ते जात आहेत. विशाल पाटील यांचं विमान गुजरातच्या दिशेने जात आहे. आता विमान गुजरातला उतरू शकतं. विशाल पाटील नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार आहेत? असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

भाजपवर निशाणा

महाविकास आघाडीतील वसुली रॅकेटर वाले सर्व भाजपात गेले आहेत. देशभरातील वसुली रॅकेटर भाजपात गेले, त्यामुळे भाजपाचे आभार… महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उध्दव ठाकरे, शरद पवार असा सामना आहे. नरेंद्र मोदींचा पराभव निश्चितपणे होणार आहे. फडणवीस कोणत्या तरी अंधारात चाचपडत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

सांगली काँग्रेसचे नेते दिल्लीत

सांगलीच्या जागेवरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काल रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल यांची भेट घेत सांगलीच्या जागेवर चर्चा केली आहे. सांगलीच्या जागेवर अनेक वर्षांपासून काँग्रेसच अस्तित्व आहे त्यामुळं ही जागा सोडायला नको, अशी भूमिका वरिष्ठांकडे मांडली आहे. काही वेळा आधी विशाल पाटील यांनी पत्र लिहित कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. सांगलीची जागा काँग्रेसच लढणार असल्याचं ते म्हणालेत.