रांगोळी, आकर्षक फुगे आणि केकची मेजवानी, गायीचा पहिल्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन

गाईच्या वाढदिवसानिमित्त तिला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. (Sangli Cow Birthday Celebration)

रांगोळी, आकर्षक फुगे आणि केकची मेजवानी, गायीचा पहिल्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन

सांगली : कुटुंबातील लहानांपासून थोरांपर्यंत आपण सर्वांचेच वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. मात्र सांगलीत एका शेतकऱ्याने चक्क गाईचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे एखाद्या माणसाप्रमाणे शेजारी-पाजाऱ्यांना आमंत्रण देत मोठ्या जल्लोषात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. (Sangli Cow Birthday Celebration)

सांगलीच्या मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील पोपट प्रल्हाद माने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने सर्जा या आपल्या गाईचा पहिला वाढदिवस साजरा केला. गाईच्या वाढदिवसानिमित्त तिला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते.

यावेळी गाईसाठी अर्धा किलो केक तयार करण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त परिसरात छान रांगोळी काढण्यात आली होती. तसेच गाईच्या शिंगाना आकर्षक असे फुगेही बांधण्यात आले होते. यावेळी गाईची विधीवत पूजा करण्यात आली. तसेच हॅपी बर्थडे टू यू हे गाण म्हणतं उपस्थितांनी केक कापला. उपस्थित निमंत्रिकांना पेढा, केक आणि मेजवानी देण्यता आली.

यावेळी वाढदिवसानिमित्त नटूनथटून सज्ज असलेली गाय सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. यावेळी उपस्थितही या कार्यक्रमामुळे भारावून गेले होते. सध्या या गायीच्या वाढदिवस सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरु आहे.

साताऱ्यात गाईचे डोहाळे जेवण

तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील यांच्या घरी असणाऱ्या गाईचे डोहाळे जेवण करण्यात आले. विकास किसन गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या कार्यक्रमासाठी गावातील मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. पहिल्यापासूनच गायकवाड कुटुंबात जनावरांविषयी आपुलकी असल्यामुळे हा कार्यक्रम एखाद्या महिलेच्या डोहाळे कार्यक्रमाप्रमाणचे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी त्या गायीला फुलांच्या हारांनी सजविण्यात आले होते. यानंतर गावातील आलेल्या महिलांनी गायीचे औक्षण केले. यानिमित्ताने घरातील  सर्व सदस्य त्या गाईची अधिकाधिक काळजी घेत आहेत.  (Sangli Cow Birthday Celebration)

संबंधित बातम्या : 

ओबीसींच्या महाज्योतीला पैसे देताना हात थरथरतात का? पडळकरांचा अजित पवारांना सवाल

‘मराठा आरक्षणासाठी राजे एकत्र आलेत; मग अठरापगड जातीचे मावळे गोळा करुन ओबीसी आरक्षण वाचवू’

Published On - 9:45 pm, Sat, 30 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI