
माजी मंत्री, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाक व्यक्त काश्मीरशी केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं वादग्रस्त विधान हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यात त्यांनी हे विधान केलं आहे. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांचं अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील यांची जीभ घसरली.
लोकसभा मतदारसंघातून खरंतर धैर्यशील माने हे निवडून आले आहेत. याबद्दल अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीला थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिली. यामुळे चर्चांना उधाण आलं. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे.
विरोधकांनी हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर घणाघात केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना दुसरं काही दिसत नाही एवढ्या दिवसाची झोपले होते का? देशाचे राज्याचे गृहमंत्री भाजपाचे आहे. सिल्लोडला पाकिस्तान म्हणले इतके दिवस पाकिस्तान चालत होते का? कंगना राणावत मुंबईमध्ये येऊन पाक व्याप्त काश्मीरसारखं वाटत असल्याचं बोलली होती. ती आता यांची खासदार आहे. मुंबई, इचलकरंजी आणि सिल्लोड विषयी तुम्ही असे बोलणार, असं असेल तर गृहखाते तुमच्या हातात आहे कारवाई करा, असं अंबादास दानवे म्हणालेत.
माजी खासदार विनायक राऊत यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची कीव करावीशी वाटते. पाक व्यक्त काश्मीर असेल तर तुमचं सरकार होतं तुमचं सरकार आहे. त्यांनी याचा शोध घ्यावा. प्रामाणिकपणे इचलकरंजीमध्ये राहताय. त्यांची तुलना पाकिस्तानची करणं हा मूर्खपणा आहे, असं विनायक राऊत म्हणालेत.