AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्ज फिटेल म्हणून शेतीसाठी जास्त खर्च केला अन् एका पावसाने… शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे बोर नदी दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कर्ज फिटेल म्हणून शेतीसाठी जास्त खर्च केला अन् एका पावसाने... शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना
| Updated on: Sep 25, 2025 | 4:42 PM
Share

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या पावसामुळे पूर्व भागात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. बोर नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून जतच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मका, तूर, बाजरी, भुईमूग यांसारख्या पिकांबरोबरच डाळिंब आणि द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले. यंदा पावसाला चांगली सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. चांगल्या पिकांमुळे मागील वर्षांचे कर्ज फिटेल अशी आशा त्यांना होती. मात्र परतीच्या पावसाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.

पिकांना मोठा फटका

तसेच उमदी भागासह अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहितीही समोर आली आहे. बोर्गी आणि बालगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे बोर नदी पूर्णपणे भरून वाहत आहे. ज्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मोरबागी, गिरगाव, माणिकनाळ, सुसलाद आणि सोनलगी यांसारख्या गावांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. यामुळे कांदा आणि मका या पिकांना मोठा फटका बसला आहे.

या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडून तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटले आहेत, त्यामुळे माती वाहून गेली आहे आणि शेतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत द्या, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

सोलापुरात सीना नदीला पूर

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या सिंदखेड गावामध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या गावात सुमारे दीड हजार ग्रामस्थ अडकले आहेत. प्रशासनाने सांगली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकासोबत मिळून गावात पिण्याचे पाणी आणि जेवण पोहोचवले आहे. मात्र, पुराच्या भयामुळे अनेक ग्रामस्थ बोटीने सुरक्षित ठिकाणी जाण्यास तयार होत नाहीत. सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांना पाण्याचा वेढा बसलेला असून, परिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.