स्कुल चले हम…! सांगली महापालिकेचा अभिनव उपक्रम; पहिलीच्या प्रवेशासोबत आता शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षणही

या शैक्षणिक वर्षांपासून अनेक कलांचे, खेळांचे व संगणक प्रशिक्षणही मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी शाळांच्या बरोबरीने वाटचाल करत असणाऱ्या महापालिका शाळामध्ये आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहनही मनपा आयुक्तांतर्फे करण्यात आले

स्कुल चले हम...! सांगली महापालिकेचा अभिनव उपक्रम; पहिलीच्या प्रवेशासोबत आता शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षणही
महापालिका शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थाना मिळणार सर्व शैक्षणिक साहित्य मोफतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 6:13 PM

सांगलीः सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका (Municipal Corporation) येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेकडून आता मोफत शैक्षणिक संच (Educational set) देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. खासगी शैक्षणिक संस्थांमुळे (Private School) जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळांमध्ये प्रवेश संख्या कमी झाली होती. हेच चित्र अनेक शहर आणि जिल्ह्यांमध्ये आहे. सांगली, कुपवाड आणि मिरज महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांना महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा निश्चितच फायदा होणार असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

गुणवत्तेबरोबरच सर्व सुविधा

यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनातर्फे मनपा शाळांकडून गुणवत्तेबरोबरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पहिलीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे.

शैक्षणिक साहित्य मोफत

या शैक्षणिक वर्षात मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश, शूज, सॉक्स, स्कुल बॅग, 3 वह्या , दुरेघी वही, चौरेघी वही, गणित वही, चित्रकला वही, पाटी, पाटी पेन्सिल बॉक्स, पेन्सिल बॉक्स, खोड रबर बॉक्स, क्रेयॉन कलर्स, पट्टी, स्केच पेन बॉक्स, पिण्याच्या पाण्याची बाटली, रेनकोट असे शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाणार आहे.

पालकांना आवाहन

त्यामुळे महापालिकेच्या या सुविधांचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घेऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश मनपा शाळांमध्ये घ्यावा असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

महापालिका शाळांमध्ये आजच प्रवेश घ्या

याबरोबरच या शैक्षणिक वर्षांपासून अनेक कलांचे, खेळांचे व संगणक प्रशिक्षणही मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी शाळांच्या बरोबरीने वाटचाल करत असणाऱ्या महापालिका शाळामध्ये आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहनही मनपा आयुक्तांतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

अ‍ॅड. पानसरे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, न्यायाधीशांनी संशयितांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळाला

वडिलांच्या मारेकऱ्याच्या मुलासोबत तरूणीने बांधली लग्नगाठ, आईनंही रोखलं नाही, कारण तर वाचा…

Navneet Rana and Ravi Rana : राणांना एकाच वेळेस दिलासा आणि धक्का, दुसरा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.