रजेसाठीच्या आंदोलनामुळे आधी पत्नीला झाली अटक; तर आता नवऱ्यालाही एसटी महामंडळानं दिला दणका..

| Updated on: Mar 14, 2023 | 4:08 PM

पत्नीच्या आंदोलनानंतर आणि पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

रजेसाठीच्या आंदोलनामुळे आधी पत्नीला झाली अटक; तर आता नवऱ्यालाही एसटी महामंडळानं दिला दणका..
Follow us on

आटपाडी/सांगली : एसटी महामंडळामध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी आगारातील चालक म्हणून काम करणाऱ्या विलास मारुती कदम यांनी रजना मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्या आजारी पत्नीने डेपो मॅनेजर यांच्या केबिनसमोर रात्रीच्या वेळी झोपनू तिथे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे वाद विकोपाला गेला होता. डेपो मॅनेजर यांच्या केबिनसमोर आंदोलन करण्यात आल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेऊन एसटी महामंडळाकडून चालकाच्या पत्नीविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तर आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. आटपाडी आगारातील चालक विलास मारुती कदम यांच्या पत्नीने त्यांना रजा देण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते. मात्र आता तेच आंदोलन कदम पती-पत्नीच्या अंगलट आले आहे.

आंदोलन केल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता तर आता चालक विलास मारुती कदम यांच्यावर महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पत्नीच्या आंदोलनानंतर आणि पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

त्यातच आता चालक विलास कदम यांच्यावर वर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यान आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाची माहिती घेतली असता सांगण्यात आले की, 12 मार्च रोजी आटपाडी ते इचलकरंजी या मार्गावर बस चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याने सांगलीच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी त्याप्रकरणी चौकशी लावली होती. त्यानंतर विला कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

निलंबनाची कारवाई झाल्यानंतर चालक कदम यांनी सांगितले की, बस चालवत असताना आजारी पत्नीशी बोलत असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

तर दोन दिवसांपूर्वी विलास कदम यांच्याच पत्नीने नवऱ्याला रजा द्या म्हणून आटपाडी डेपोत ठिय्या मांडून आंदोलन केले होते. त्यामुळे हे आंदोलन चर्चेत आले होते.

आता विलास कदम यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे की, निलंबित मुदतीत विलास मारूती कदम यांनी आटपाडी आगार व्यवस्थापकाकडे साप्ताहिक सुट्टी सोडून दररोज सकाळी 10 वाजता हजेरी देऊन कार्यालयीन वेळेपर्यत हजर राहतील तसेच त्यांना आटपाडी आगार यांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही असाही आदेश देण्यात आले आहेत.