रेल्वेच्या नोकरीचे आमिष दाखवून 17 लाखाची केली फसवणूक; सांगलीत गुन्हा दाखल; प्रशिक्षण देण्याचेही नाटक

रेल्वे विभागात नोकरी लावतो म्हणून कलकत्ता, दिल्ली, रांची, लखनऊ, पुणे, मुंबई इतर ठिकाणी घेऊन जाऊन ट्रेनिंग देऊन रेल्वे विभागाचे नोकरीस दाखल होण्याचे बोगस पत्रही देण्यात आले आहे.

रेल्वेच्या नोकरीचे आमिष दाखवून 17 लाखाची केली फसवणूक; सांगलीत गुन्हा दाखल; प्रशिक्षण देण्याचेही नाटक
रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून सांगलीच्या तरुणाची फसवणूक
शंकर देवकुळे

| Edited By: महादेव कांबळे

Jun 18, 2022 | 6:07 PM

सांगलीः रेल्वेमध्ये नोकरी (Railway Job) लावतो असे सांगून रेल्वे विभागाचे बोगस पत्र तयार करून ट्रेनिंग देऊन तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. याबाबत फिर्यादी मनोज तुकाराम नलवडे (रा. कराड, जखिनवाडी) यांनी सांगलीच्या पलूस पोलीस ( Sangli Police)ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींची फसवणूक झाली आहे, त्यांना प्रशिक्षणही देण्याचे नाटक करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून सांगणारी मोठी टोळी सक्रिय असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

रेल्वे विभागात नोकरी लावतो म्हणून कलकत्ता, दिल्ली, रांची, लखनऊ, पुणे, मुंबई इतर ठिकाणी घेऊन जाऊन ट्रेनिंग देऊन रेल्वे विभागाचे नोकरीस दाखल होण्याचे बोगस पत्रही देण्यात आले आहे.

पैशांची 2018 पासून फसवणूक

2018 पासून 2021 पर्यंत वेळोवेळी रोख स्वरूपात तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद मनोज नलवडे यांनी पोलिसात दिली आहे.

फसवणूक करणारी टोळी कार्यरत

त्यानंतर पोलिसांनी सय्यद नूर मोहम्मद शेख (रा. पलुस, ता. सांडगेवाडी) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. संभाव्य आरोपी हे पोलिसांना गुंगारा देऊन राहण्याची ठिकाणे बदलत होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मौलाना शौकत मुल्ला (रा.नागठाणे), शाहीन सिकंदर मुलांनी, सौरभ श्रावण पाटील, (शिंगणापूर,जि. कोल्हापूर) यांना अटक केली आहे. तसेच महाराष्ट्रासह लखनऊ, दिल्ली, कलकत्ता येथे अशा प्रकारची रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे, त्याचा तपास लवकर लागेल असे पोलिसांनी सांगितले.

आणखी काही तरुणांची फसवणूक

या प्रकारची फसवणूक आणखी कोणत्या तरुणांची झाली आहे का याचा तपासही पोलीस करत आहे. या प्रकरणातील जे संशयित आरोपी आहे त्यांच्याकडून कोणकोणत्या परिसरातील तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. त्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें