AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat : हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले

Vidyanand Bapat : याच आठवड्यात विद्यानंद बापट टीव्ही 9 मराठीच्या शो मध्ये बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर डीजे विरोधातील सूर अधिक बळकट झाला. गणेशोत्सव जवळ येत असताना डीजेचा मुद्दा राज्यात मोठा राजकीय मुद्दा बनला आहे.

Vidyanand Bapat : हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले
vidyanand bapat-Sangram bhandare
| Updated on: Sep 06, 2026 | 5:38 PM
Share

पुण्यात डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना दिवसेंदिवस जनसमर्थन वाढत चाललं आहे. त्याचवेळी त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्याही कमी नाहीय. हिंदुत्ववादी विचारसरणीचे किर्तनकार संग्राम भंडारे यांनी विद्यानंद बापट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “विद्यानंद बापट कोणाला माहित नव्हते, तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी डिजे विरोधात भूमिका घेतलेली. बापट आधी डिजे, लेझरला विरोध करतात, मग ढोल ताशाला, त्यानंतर मिरवणूक या रस्त्यावरुन नको त्या रस्त्यावरुन न्या असं बापट म्हणतात” अशी टीका संग्राम भंडारे यांनी केली.

“काल परवा आलेले हा विद्यानंद बापट, डीजेच्या माध्यमातून आला. मी डीजेला विरोध करतोय, मी लेझर लाइटला विरोध करतोय. नंतर-नंतर ते वळणाचं पाणी वळणाला गेलं. ते नंतर म्हणायला लागलं ढोल-ताशा नको, लेझीम नको. ढोल-ताशाला विरोध करणारा भारतीय कसा असू शकतो?” असा सवाल संग्राम भंडारे यांनी विचारला. “तो महाराष्ट्रीय कसा असू शकतो? मिरवणुकीचे रस्ते बदला, हा बाप झालाय का?” अशा शब्दात संग्राम भंडारे यांनी विद्यानंद बापटवर हल्लाबोल केला.

डीजेच्या मुद्यावर दोन गट

याच आठवड्यात विद्यानंद बापट टीव्ही 9 मराठीच्या शो मध्ये बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर डीजे विरोधातील सूर अधिक बळकट झाला. गणेशोत्सव जवळ येत असताना डीजेचा मुद्दा राज्यात मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. नागपूर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई इथे भव्य गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका निघतात. त्यावेळी डीजे वाजवला जातो. आता डीजेच्या मुद्यावर राज्यात दोन गट पडले आहेत. कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी, लोकसहभागातून लोकांना विश्वासात घेऊन डीजेच्या मुद्यावर तोडगा काढावा अशी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भूमिका आहे.

चांदीचे कडं देऊन सन्मानित करणार

संग्राम भंडारे यांनी यापूर्वी सुद्धा विद्यानंद बापटच्या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणला चांदीचे कडं देऊन सन्मानित करणार असल्याची घोषणा संग्राम भंडारे यांनी केली आहे. विद्यानंद बापट फक्त डीजे विरोधामुळेच नव्हे, तर त्याच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे सुद्धा चर्चेत आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली