AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Temple Donation Row : ठाकरेसेनेने राम मंदिरासाठी दान केलेल्या चांदीच्या 4 किलोच्या विटा गायब; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

Sanjay Raut on Ram Temple Donation Row : अयोध्या येथील राम मंदिराला ठाकरेसेनेने दिलेल्या ४ कोटीच्या विटा गायब झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

Ram Temple Donation Row : ठाकरेसेनेने राम मंदिरासाठी दान केलेल्या चांदीच्या 4 किलोच्या विटा गायब; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ
| Updated on: Jun 26, 2026 | 10:35 AM
Share

अयोध्येतील राम मंदिर कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलं आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या कथित प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने राम मंदिराला दान केलेली चांदीची 4 किलोची वीट गायब झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत राम मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी म्हटलं की, ‘राम मंदिराच्या बांधकामादरम्यान शिवसेनेने दिलेली चांदीची 4 किलोची वीट गायब आहे. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधूसंताच्या उपस्थितीत एक कोटी रुपये आणि चांदीची वीट दान केली होती. आता यास इतकी वर्षे उलटल्यानंतरही ट्रस्टकडून कोणत्याही प्रकारची पावती आणि माहिती मिळालेली नाही. दान केलेली वीट नक्की कुठे गेली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची हीच वेळ आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे .

https://x.com/rautsanjay61/status/2070340400070705491

पोलिसांकडून ८ जणांना अटक

राम मंदिर कथित गैरव्यवहार प्रकरणात आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी या आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांची अयोध्या येथील राम जन्मभूमि पोलीस स्टेसशनमध्ये चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची संपूर्ण रात्र चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. पोलीस आज आरोपींना कोर्टात हजर करणार आहेत. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली चोरी, गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोण आहेत आरोपी?

कथित गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी 8 जणांना अटक केली. रमाकांत उर्फ टिन्नू यादव, सुभाष श्रीवास्तव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव आणि रमाशंकर मिश्रा यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे मंदिराला मिळालेल्या देणग्या मोजण्याच्या कामात सहभागी होते. अटक करण्यात आलेले 6 जण कॅशिअर होते. रोख रक्कम मोजण्याचे आणि बँकेत पोहोचवण्याचे काम टिन्नू यादव पाहत होता. तर सुभाष श्रीवास्तवच्या देखरेखीखाली सहा कॅशिअर राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा हिशोब ठेवत होते.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह