AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वर्षात जनतेला नामर्द करण्याचे काम भाजपाचे, संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट…

जगातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताा संजय राऊत दिसले. राऊतांनी थेट भारतीय जनता पक्षावर टीका केली. हेच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मित्र नाही तर त्यांच्याकडे डोनाल्ड ट्रम्प असल्याचेही राऊतांनी म्हटले.

10 वर्षात जनतेला नामर्द करण्याचे काम भाजपाचे, संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट...
Sanjay Raut
| Updated on: Mar 31, 2026 | 10:35 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाबाबत बोलताना संजय राऊत यांनी मोठे विधान केले. संजय राऊत यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांना कोणीही मित्र नाही. डोनाल्ड ट्रम्प गुलामांना नियुक्त करतो. अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली असेल तर त्या जनतेचे अभिनंदन केले पाहिजे, त्यांच्या धाडसाबद्दल, त्यांच्या सहाजाबद्दल, मर्दानीबद्दल. भारतात भारतीय जनता पक्षाने जनतेला जी धर्माची गोळी देऊन जे बधिर केले आहे, त्या बधिरतेतुन जनतेने बाहेर यावे. येथे सुद्धा त्याचप्रकारची मनमानी आणि झुंडशाही सुरू आहे. लोकशाही संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे उघड्या डोळ्यांनी पाहवे आणि जागृती व्हावे. देशाने यापूर्वी रस्त्यावर उतरून क्रांती केलेली आहे. मग ती स्वातंत्र्य चळवळ असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल. दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई असेल आणीबाणीच्या काळातील. पण गेल्या दहा वर्षांमध्ये जनतेला नामर्द करण्याचे काम भाजपा आणि त्यांच्या नेतृत्वाने 100 टक्के केले आहे.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, अमेरिकेत एक करोडच्या आसपास लोक रस्त्यावर उतरल्याचे राऊतांनी म्हटले. अमेरिकेतच्या सध्याच्या परिस्थितीवर राऊत स्पष्टपणे बोलताना दिसले. पण भारतातील जनता हे का करू शकत नाही, हे देखील संजय राऊतांकडून सांगण्यात आले.

इराण आणि अमेरिका युद्धामध्ये जगातील अनेक देश होरपळले जात आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. धक्कादायक म्हणजे सतत तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठ या युद्धामुळे अस्थिर राहिली. जग एका वेगळ्या संकटात उभे असल्याचे बघायला मिळत आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी सतत केली जात आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. सरकार यातून मार्ग काढत आहे. पण इराणकडून थेट गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीवर हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडी पूर्णपणे खुली नाही. गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीवर हल्ले होत असल्याने युद्ध थांबल्यानंतरही जगाला वेगळ्या संकटातून जावे लागणार हे स्पष्ट आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात