नाशिकचे आयुक्त आणि मंत्री गिरीश महाजन यांचं टेन्शन वाढलं; संजय राऊतांनी केली मोठी मागणी

नाशिकच्या खड्ड्यांंवरून ठाकरे गटाने मोर्चा काढला. या मोर्चातील एका सभेतून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

नाशिकचे आयुक्त आणि मंत्री गिरीश महाजन यांचं टेन्शन वाढलं; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
Sanjay raut news
| Updated on: Aug 17, 2026 | 1:36 PM

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्यांवरून राजकारण पेटलं आहे. नाशिकमधील खराब रस्त्यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. शहरातील खड्ड्यांने अनेकांच्या घरातील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाने मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे नाशिकचे आयुक्त आणि कुंभमेळा मंत्र्‍यांवर 302चा गुन्हा दाखल करा, अशाी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या मागणीने नाशिकचे आयुक्त आणि मंत्री गिरीश महाजन यांचं टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे.

संजय राऊत यांनी नाशिकच्या मोर्च्याला हजेरी लावली. या मोर्चातील सभेतून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले,’नाशिकच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा मृत्यू झालाय. एखाद्याची हत्या केली तर 302 कलमांतर्गत तर फाशी होते. यांनी थेट 10 -12 हत्या केल्या. आयुक्त, कुंभमेळा मंत्री, चंपतरायवर 302 चा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. यांची जबाबदारी नाही का? कशासाठी खुर्ची उबवता? हसत हसत 5 लाख रुपये देता… असं सांगता. गरीबाच्या जीवाची किंमत पाच लाख रुपये आहे का? लक्षात घ्या, मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये दिले पाहिजे. जखमींना 50 लाख रुपये दिले पाहिजे. जखमी लोक हे आयुष्यभरासाठी दिव्यांग आणि बेकार झाले आहेत. त्यांच्या रुग्णालयाचं बिल 10 लाख झालं. मृतांना पाच लाख देतात. कंत्राटातून कोट्यवधींचं कमिशन खातात. डुब्लिकेट वर्क ऑर्डर पॅटर्न….कुंभमेळ्याचे 35 हजार कोटी कोणाच्या खिशात गेले? माझ्याकडे मघाशी कागद आले. यांच्या जावयाला एका दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातून कंत्राट आलं. चौधरी असे जावयाचं नाव. यांनी सत्तावीस कोटी एकाच दिवशी खाल्ले’.

‘मखमलाबादला स्विमिंग पूल केले. एक मोठा खड्डा दिसला. त्यात भाजपचे 72 नगरसेवक टाकू म्हटले. बाकी खड्ड्यात मिंध्येचे नगरसेवक. दत्तक पिता फडणवीस म्हणाले इराणच्या युद्धामध्ये डांबर मिळत नाही म्हणे. दत्तक घेतलंय ना नाशिकला तुम्ही बाप आहेत. खरंतर हा मोर्चा इशारा आहे. रेडा तुमच्या घरात घालू. रस्त्यावरचे शिवसैनिक आम्ही आहोत. रस्त्यावर शिवसेनेचा जन्म झाला. गिरीश महाजन येऊन सांगेल, यांना काही कळत नाही, रेडा तुझ्या मागे लावणार. सगळ्या भानगडी समोर आल्या आहेत. आता नाशिकमध्ये समोर आणू . सगळे घाबरले आहेत गेट लावून घेतला. देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे त्याला माहीती नाही. कितीही बंदोबस्त करा, सगळे घुसले होते दिल्लीत. मोदी शहा पळून गेले, तू कोण लागून गेला. आम्ही आतमध्ये घुसू. हा संताप चीड राग आणि आग ही अशीच पेटती ठेवा. नाशिककरांनी आपल्याला मतदान केलं नाही. पैसे घेऊन मतदान केलं, एक बाई म्हणाली, भाजपचे नगरसेवक आंदोलन करत आहे. राजीनामा देऊन आमच्या मोर्चात सहभागी व्हा. अयोध्या आणि दुसरी अयोध्ये जिथं रामाचं वास्तव्य आहे. अयोध्येत सीतामाईचं मंगळसुत्र लुटूल त्यांचीच इथं पिलावळ आहे, असे ते म्हणाले.

‘अयोध्येतील रामाला सोडलं नाही. ते पंचवटीतील रामाला काय सोडणार. पण आपण यांना सोडायचे नाही. प्रत्येकाच्या घरी जाऊन घेरायचे आहे. ऐकलं नाहीत, मनमानी केली तर गेट तोडून आतमध्ये येऊ. गेट तोडायचा अनुभव मला सगळ्यात जास्त आहे. एकजूट दाखवली नाशिककरांसाठी आयुक्तांना जाऊन भेटा, खड्डे बुजविण्यास कालमर्यादा द्या. हवेतील शब्द नकोत. खड्डे बुजवले नाहीतर आम्ही आणि तुम्ही आहोत. सगळं कुंभमेळा भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. सगळे ठेकेदार गुजरातचे आहेत. जामनेर आहेत, कुंभमेळा करायला जळगाव सेना आणली आहे. श्रावणातील सोमवार रस्त्यावर लोकं अडकले आहेत. ही लढाई संपलेली नाही, आतमध्ये जाऊन तारीख घ्या, असे त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us