AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप, थेट भाजपावर..

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 12 वर्षामध्ये मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणे मोदींना शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.

राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप, थेट भाजपावर..
Sanjay Raut
| Updated on: Jun 09, 2026 | 10:37 AM
Share

नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, पंडित नेहरू यांनी कोणतेही विरोधी पक्ष फोडले नाहीत, जे आज मोदी आणि शाह फोडत आहेत. अनेक राज्यांमध्ये त्यांच्या विरोधातील सरकारे आली. लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारच्या विरोधात बोलणारे अनेक बुलंद नेते आले आणि त्यांनी नेहरूंच्या तोंडावर टीका केली. त्यात अटलबिहारी वाजपेयी होते हे लक्षात घ्या. पण हे आमच्या विरोधात बोलत आहेत, म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. खर म्हणजे मोदींनी एक तप झाल्यानंतर केदारनाथच्या गुफेत जाणून 12 वर्षाचे आत्मचिंतन केले पाहिजे. त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत. मग त्यांनी या 12 वर्षात काय केलं याचा लेखाजोखा त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सादर केला पाहिजे.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याला काही उत्तर आहे का भारतीय जनता पक्षाकडे? एकदाही जनतेने विचारलेल्या प्रश्नांनी समोर येऊन उत्तर दिली नाहीत. 12 वर्ष झालीत अजून 12 वर्ष होतील. देशाला काय उपयोग झाला? देशाच्या लोकशाहीला काय उपयोग झाला? तुम्ही फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम मोडला असेल पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणे अशक्य नाही.

पंतप्रधानपदाची घोडदाैड सुरू आहे पण त्याखाली लोकशाही तुडवली गेली. देशाचा निवडणूक आयोग तुडवडा गेला. अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभे राहून त्यांची घोडदाैड सुरू आहे. म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचे धाडस दाखवायला पाहिजे. ऑपरेशन सिंदूर देखील त्यांना जागतिक दबावाखाली गुंडाळावे लागले. मोदी हे नेहरूंच्या अत्यंत विरूद्ध वागत आहेत. पंडित नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेले एक तेजस्वी नेतृत्व होते. पंडित नेहरू यांनी देशासाठी आपली सर्व संपत्ती दान केली. ज्या संपत्तीची किमत आज 80 हजार कोटी आहे.

ही संपत्ती पंडित नेहरू यांनी देशासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी दान केली. पंडित नेहरूंच्या काळात अदानी, अंबानी हे कोणी निर्माण झाली नाही. पंडित नेहरू यांनी सार्वजनिक उद्योग निर्माण केले. तेल कंपन्या, एलआयसी, आयआयटी असे अनेक. मोदींनी काय केले? हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगायला पाहिजे. ही अपेक्षा पत्रकारांनी, जनतेने केली तर भारतीय जनता पक्षाला राग येण्याचे काम नाही. राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला गेले. ही संपूर्ण व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे म्हणते राऊतांनी गंभीर आरोप केला.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम