‘सर्वात मोठा फेक नरेटिव्ह म्हणजे…’, संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते मुलूंडमध्ये आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार शिबीरात बोलत होते.

सर्वात मोठा फेक नरेटिव्ह म्हणजे..., संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Mar 09, 2025 | 8:30 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुलुंडमध्ये आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार शिबीरात बोलत होते. दुबईला मॅच सुरु आहे, पण सर्व शिवसैनिक इथं बसलेले आहेत. मॅच नेहमीच होत असतात, निर्धार मेळावे नाही. त्यामुळे मेळावा झाला पाहिजे. पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत, तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

‘मी उद्धवजी यांना सांगू इच्छितो की सकाळी 10 वाजता निर्धार शिबीर सुरु झालं, तेव्हापासून हे सभागृह गच्च भरलं ते आतापर्यंत आहे. दुबईला मॅच सुरु आहे, पण सर्व शिवसैनिक इथं बसलेले आहेत.  मॅच नेहमीच होत असतात निर्धार मेळावे नाही.  त्यामुळे मेळावा झाला पाहिजे. निर्धार मेळावे कायम व्हायचे पण सत्ता आणि आणि आपण ढिले पडलो, आता पुन्हा आपण आपले कार्यक्रम सुरू केले पाहिजेत. या हॉलमध्ये कडवट शिवसैनिक बसले आहेत.   पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत, तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सगळ्यात मोठं फेक नेरीटिव्ह कोणतं असेल तर ते म्हणजे भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. आता तर अख्या भाजपची काँग्रेस झालेली आहे. कोणताही जिल्हा तालुका काढा 80 टक्के नेते हे काँग्रेसचे आहेत. आम्ही देखील त्यांच्या विरोधात लढलो होतो. शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे. ती जमीनीवर वाघ असते आणि झेप घेते तेव्हा गरुड पक्षी असतो. त्यांचा पराभव करता येत नाही

उद्धवजी यांच्यावर अनेक वार होत आहेत, पण ते वार झेलत आहेत. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, की आपल्याला बाळासाहेबांचा वारसा पुढे न्यायचा आहे. बुद्धिबळाच्या पटावर हत्ती मारला जातो. वजीर मारला जातो पण राजा आहे, तोपर्यंत आपण बुद्धीबळाच्या खेळात असतो, असं राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.