Sanjay Raut : शरद पवार NDA सोबत जाणार का? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर भाष्य केलं. यावेळी शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार नसल्याचाही दावा केला.

Sanjay Raut : शरद पवार NDA सोबत जाणार का? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
| Updated on: Aug 10, 2026 | 11:19 AM

शरद पवारांचे 8 खासदार हे पंतप्रधान मोदींना आज भेटणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात ही सर्व खासदार हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. सर्व खासदार हे मतदारसंघातील प्रश्नांवरून बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु या भेटीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबतही जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चावरून संजय राऊत यांनी भाष्य केलं. शरद पवार आणि त्यांचे खासदार एनडीएसोबत जाणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी चर्चा फेटाळून लावली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले, ‘देशांचे गृहमंत्री संसदेत यायला तयार नाही. ते मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतात. परंतु संसदेच्या सभागृहात येत नाही. पंतप्रधान मोदी देखील येत नाही. विरोधकांची मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे 10 वाजता बैठक आहे. त्यात आम्ही निर्णय घेऊ;.

राष्ट्रवादीचे खासदार- पंतप्रधान मोदींच्या भेटीवर राऊत म्हणाले, ‘याकडे गांभीर्याने बघण्याची गरज नाही. आमदारांनी मुख्यमंत्र्‍यांना भेटावे, याकडे विशेष काय आहे? आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदार त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी पंतप्रधानांना भेटणे आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे. पंतप्रधान संसदेत येत नसल्याने भेटावे लागत आहे. गृहमंत्री देखील येत नाही. आम्ही भेटायला कधीच जात नाही. ती आमच्या पक्षाची भूमिका आहे. शरद पवारांचे आठ खासदार लपून छपून भेटत नाही. रितसर त्यांनी वेळ घेतली आहे. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे असून त्यांचं नेतृत्व करत आहेत. काल सुप्रियाताईंशी यावर चर्चा झाली आहे. कोणत्या जिल्ह्यातील काय प्रश्न आहेत, एक एक खासदार भेटायला जाण्यापेक्षा एकत्र जाणे चांगले. एकत्र जाऊन पंतप्रधानांकडे प्रश्न मांडण्याची सुप्रिया सुळेंची भूमिका योग्य आहे’.

डिलीमिटेशनवर राऊत म्हणाले, मला वाटत नाही की, इंडिया आघाडीच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीचे खासदार भूमिका घेतील, असं मला वाटत नाही. असं मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. सुप्रिया सुळे आणि शरद पवार पाठिंबा देतील वाटत नाही. 850 खासदार करणे आणि हवे तसे मतदारसंघ बनवायचे, हे राष्ट्रहितासाठी योग्य नाही. त्यामुळे शरद पवार पाठिंबा देणार नाहीत. त्यांचे खासदार पाठिंबा देतील, असे आम्ही मानत नाहीत’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us