Sanjay Raut : महाविकास आघाडी विधानसभा आली की…संजय राऊत यांचा मविआ, इंडिया आघाडीवर हल्लाबोल

Sanjay Raut : "आम्ही सगळे एकत्र असतो तर मुंबईत, महाराष्ट्रात निकाल नक्कीच वेगळे लागले असते. काँग्रेसची कामगिरी वाईट नाही पण एकत्र असतो तर महापालिकेत भाजपं सत्तेवर दिसली नसती. हेच मत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांच आहे" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : महाविकास आघाडी विधानसभा आली की...संजय राऊत यांचा मविआ, इंडिया आघाडीवर हल्लाबोल
Sanjay Raut-Uddhav Thackeray
| Updated on: Feb 18, 2026 | 10:31 AM

“मूळात इंडिया आघाडीच नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलेलं नाही. अनेक नेत्यांचा आतला आवाज उफाळून वर आला असं मी म्हटलय. प्रामुख्याने काँग्रेस पक्षातलेच लोक आहेत. अंतरात्मा आणि त्यात कोण आहेत. मणिशंकर अय्यर एकेकाळचे काँग्रेसचे नेते आहेत. दुसरे मनमोहन सिंह यांच्यावर खळबळजनक पुस्तक लिहिणारे संजय बारू यांनी टेलिग्राफमध्ये आपली भूमिका व्यक्त केली. पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. बिहारचे निकाल लागून गेले आहेत. ते अत्यंत निराशाजनक आहेत. अशावेळेला पाच राज्यांच्या निवडणुका आणि भविष्यात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका यासाठी इंडिया आघाडी मजबुतीने पुढे जाणं हे आवश्यक आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत एक झुंज दिली जात आहे. राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर फेकावं इतकी धास्ती राहुल गांधींची या लोकांनी घेतली आहे” असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या संपादकीयमध्ये इंडिया आघाडीवर लेख लिहिला आहे. त्यावरुन पत्रकारांनी त्यांना इंडिया आघाडीचं नेतृ्त्व बदलाची मागणी करताय का? असा प्रश्न विचारला. “निवडणुका आल्या लोकसभेच्या की इंडिया आघाडी वळवळू लागेत, ती जिवंत आहे असं दाखवलं जात. त्यानंतर इंडिया आघाडी अनेक राष्ट्रीय प्रश्नावर प्रेसिडेंट ट्रम्पने अमेरिकेला गुलाम केलं त्यावर इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं होतं. देशभरात आपण यावर काय जागरुकता आणली पाहिजे. राहुल गांधी बोलतायत इतर अनेक नेते बोलतायत. पण सामुदायिकरित्या काही करता येईल का शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, कायद सुव्यवस्थेचा प्रश्न, मणिपूरच प्रश्न स्वतंत्रपणे आवाज येत आहेत. हा कोलाहल, गोंधळ आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. मणिशंकर यांचा आवाज फार मोठा नाहीय. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली. संजय बारूच्या विधानांना प्रसिद्धी मिळाली. या संदर्भात सामनाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“काँग्रेस हा इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे. 100 च्या आसापास खासदार त्या एकापक्षाचे आहेत. त्यानंतर तृणमुल काँग्रेस, अण्णाद्रमुक हे पक्ष आहेत. काँग्रेस या आघाडीचं नेतृत्व करतेय असं जर आपण मान्य केलं, तर काँग्रेस पक्षाची देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी मोठी आहे . आम्ही भविष्याचा करतो तेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी काँग्रेसचा नेता होईल अशी आमची भूमिका असते. लोकसभा निवडणुका आल्यावर जाग येऊन चालणार नाही असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे. लोकसभा निवडणुका आल्या की जागा वाटपाला बसायचं. त्याच्याआधी काही घडामोडी आघाडीच्या दृष्टीने होणं गरजेचं आहे” असं संजय राऊत म्हणाले.

ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे

“महाविकास आघाडी विधानसभा आली की जागी होईल. या राज्यात जे काय चालू आहे, त्यावर मविआ म्हणून एकत्र येऊन चर्चा करणार आहोत की नाही ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. एकत्र येऊन अनेक प्रश्नांना सामोरं जाणं गरजेच आहे. मतभेद कोणाशी नाहीत. पण ही शिवनसेनेची भूमिका आहे. आम्ही चळवळीतले, आंदोलनातले लोक आहोत. आम्ही घरी बसू शकत नाही. आम्हासा सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यासाठी देशात-राज्यात एकत्र येणं गरजेचं आहे” असं संजय राऊत म्हणाले.

रोहित पवारांसोबतच्या भेटीवर काय म्हणाले?

“काल रोहित पवार आणि माझी सत्र न्यायालयात अचानक भेट झाली. अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांचं काम चालू आहे, त्या बद्दल त्यांनी माहिती दिली. त्याशिवाय इतरही घडामोडी पडद्यामागे झाल्या त्या बद्दल त्यांनी माहिती दिली” असं संजय राऊत म्हणाले.