Sanjay Raut : अमित शाह यांना पुढची परिस्थिती हाताळता येणार नाही, म्हणून त्यांना हटवा – संजय राऊत

Sanjay Raut : "आमचं पंतप्रधानांना आवाहन आहे, भारत-पाकिस्तानात तणाव आहे, त्याचा फटका भारताला भविष्यात आर्थिक दृष्टया बसण्याची शक्यता आहे. पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, अभिमानासाठी तयार आहे. एक पक्ष, एक व्यक्ती नेतृत्व करतोय म्हणून नाही, आम्ही लढायला सज्ज आहोत" असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

Sanjay Raut : अमित शाह यांना पुढची परिस्थिती हाताळता येणार नाही, म्हणून त्यांना हटवा - संजय राऊत
sanjay raut amit shah
| Updated on: May 06, 2025 | 11:33 AM

“14-15 दिवस झालेत. पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांनी ज्या आमच्या 27 लोकांचा बळी घेतला, त्या संदर्भातला बदला काय? हा प्रश्न आहे. दिल्लीत भेटीगाठी सुरु आहेत. आपल्याला जपानने, पुतिनने पाठिंबा दिलाय. उद्या युद्ध सराव आहे जनतेचा, मॉक ड्रील, आम्ही त्यालाही तयार आहोत. युद्ध सराव अनेक देशामध्ये होत असतो. विशेषत: ज्या देशांना सातत्याने युद्धाची भिती असते, त्यांना सातत्याने युद्ध सराव करावा लागतो” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “भारतात जनता तेवढी अज्ञानी नाही. भारत-पाकिस्तान युद्धापेक्षा मोठ युद्ध करोनाविरोधात लढलो आहोत. भारताची जनता मानसिक दृष्टया मजबूत आहे. या सगळ्या गोष्टीत तुम्ही जनतेला मानसिक दृष्टया अडकवून ठेवलं आहे. अनेक देशात एखाद्या देशावर सैन्य तळावर, नागरिकावर हल्ला झाला तर २४ तासात बदला घेतात” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“युद्ध सरावात आम्हाल बंदुका देणार का? भोंगे वाजणार, ब्लॅक आऊट होणार. आम्ही 1971 साली हे पाहिलय. याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते. जशा थाळ्या-टाळ्या वाजवल्या, तसं युद्ध सरावात अजून काही दिवस घालवतील, सैन्य कायम सज्ज असतं. भारतीय सैन्य कायम सज्ज आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “आता आमच प्रश्न आहे, देशाचे संरक्षण मंत्री आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना देश युद्ध करतोय हे राष्ट्रपतींना माहित आहे की नाही? या विषयी माहित नाही” असं संजय राऊत म्हणाले.

‘आम्हाला कुणाची उणी-दुणी काढायची नाहीत’

“पाकिस्तानी संसदेच विशेष अधिवेशन भरलं आहे. आमची पहिल्यादिवसापासून मागणी आहे, काश्मीरच्या प्रश्नावर दोन दिवसीय संसदेच विशेष अधिवेशन केलं पाहिजे. सगळ्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. आम्हाला कुणाची उणी-दुणी काढायची नाहीत. आम्ही सरकारसोबत, देशासोबत आहोत. हा देश आमचाही आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना एकदा काय ते आर-पार होऊन जाऊ द्या किती दिवस टांगती तलवार ठेवणार आहात” असं संजय राऊत म्हणाले.

‘अमित शाह अपयशी गृहमंत्री’

“पुढे जी परिस्थिती निर्माण होईल, त्यासाठी आत्तापासून सगळ्या पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. युद्धानंतर जी पिरिस्थिती निर्माण होते, अफगाणिस्तान, युक्रेन, इराणमध्ये आहे, युद्धानंतर अनेक अडचणींना सामोर जावं लागेल. म्हणून तुम्ही देशातल्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. देशाचे गृहमंत्री अमित शाह अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना पुढची परिस्थिती हाताळता येणार नाही. त्यामुळे त्यांना हटवा” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.