“सुरेश धस भाजप परंपरेस जागले, वापरा आणि फेका”; संजय राऊतांचा घणाघात
भाजप नेते सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले, त्यानंतर त्यांची भेट झाल्याने खळबळ उडाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी धस यांच्यावर तीव्र टीका केली आहे, त्यांच्या कृतीला "वापरा आणि फेका" असे संबोधले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे. भाजप नेते सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एकीकडे हे प्रकरण गाजत असताना दुसरीकडे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी टीका केली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुरेश धस भाजप परंपरेला जागले. वापरा आणि फेका. वापरा आणि सौदा करा, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपा परंपरेस जागले.वापरा आणि फेका .वापरा आणि सौदा करा. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाले? असे संजय राऊतांनी म्हटले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपा परंपरेस जागले.वापरा आणि फेका .वापरा आणि सौदा करा. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाले? @supriya_sule @Dev_Fadnavis @iambadasdanve pic.twitter.com/8j6YHdFXin
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 18, 2025
दरम्यान बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे मराठवाड्यातील राजकारण तापले आहे. या घटनेमुळे सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त दवस उलटले आहेत. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. त्यांची यातंर्गत चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या मुद्द्यावरुन भाजपाचे नेते सुरेश धस यांनीही आक्रमक पावित्रा घेत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. हे आरोप होत असतानाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. ही भेट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणली.
या भेटीनंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना भेटण्यामागचे स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे आजारी होते. म्हणून माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो. त्यापूर्वी भेटलो ते माझ्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी मला बोलावलं होतं. हे ३० दिवसांपूर्वी घडलं आहे. २० ते ३० मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो. संध्याकाळी साडेनऊ वाजता गुप्त भेट होऊ शकत नाही. रात्रीच्या दीड-दीड वाजेपर्यंत मंत्र्यांच्या चेंबरवर लोक असतात. प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत खुलासा दिलेला आहे. हे प्रकरण मिटणार नाही. त्यानंतर मी निघून आलो, असे सुरेश धस म्हणाले.