AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! संतोष देशमुख यांना तब्बल तीन तास अमानुष मारहाण, मारहाणीचे 15 व्हिडीओ आणि 8 फोटो समोर

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांना आरोपींनी अमानुष मारहाण केली, त्याचे तब्बल 15 व्हिडीओ आणि आठ फोटो सीआयडीच्या हाती लागले आहेत.

सर्वात मोठी बातमी! संतोष देशमुख यांना तब्बल तीन तास अमानुष मारहाण, मारहाणीचे 15 व्हिडीओ आणि 8 फोटो समोर
| Updated on: Mar 02, 2025 | 7:32 PM
Share

9 डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली, वातावरण चांगलंच तापलं. आता या प्रकरणात सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपत्रातून संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. आता त्यानंतर या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर तब्बल तीन तास आरोपींनी त्यांना अमानुष मारहाण केली. देशमुख यांना मारहाण करत असताना आरोपींनी या घटनेचे 15 व्हिडीओ आणि 8 फोटो काढले. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ सीआयडीनं आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त केले आहेत. या व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपी हे  संतोष देशमुख यांना  मारहाण करताना दिसून येत आहेत.

असा आहे संपूर्ण घटनाक्रम 

वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मास्टरमाईंड असल्याचं सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आलं आहे. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी अडथळा आणल्यामुळे त्यांची हत्या, करण्यात आली, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. 29 नोव्हेंबरला केजच्या कार्यालयात वाल्मिक कराड, चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी बैठक घेतली, या बैठकीमध्येच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचण्यात आला.

त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची गाडी अडवून त्यांचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली, त्यांच्या मारहाणीचा व्हिडीओ आता समोर आली आहे, तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो सीआयडीने आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त केले आहेत. या व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपी  संतोष देशमुख यांना  मारहाण करताना दिसून येत आहेत. याच मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आठ डिसेंबर 2024 ला चाटे घुले आणि अन्य चांदुर फाट्याजवळील हॉटेल तिरंगा इथं भेटले, त्यावेळी घुलेनं कराडचा निरोप दिला. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, असं त्याने म्हटलं होतं.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी