AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख यांच्या हत्येचं 3333 कनेक्शन, आरोपी सुदर्शन घुलेबाबत खळबळजनक माहिती समोर

सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणातील आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचं 3333 कनेक्शन, आरोपी सुदर्शन घुलेबाबत खळबळजनक माहिती समोर
| Updated on: Jan 06, 2025 | 3:02 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे, मात्र एक जण अद्यापही फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आता राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबतच सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांमध्येच पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपी  जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले व विष्णू चाटे यांना अटक केली. मात्र या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते, घटनेला 22 दिवस उलटले तरी देखील ते पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागत नव्हते. दबाव वाढत होता, अखेर  सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आलं आहे. तर याच दिवशी त्यांना मदत करणाऱ्या आणखी एकाला मुंबईतून अटक करण्यात आलं. मात्र अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याचा शोध शुरू आहे.

या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप करण्यात येत होता. पुण्यातून या आरोपींना अटक करण्यापूर्वीच तो सीआयडीला शरण आला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी  सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना कोर्टानं 18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे.

3333 कनेक्शन अन्  सुदर्शन घुले 

समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे सुदर्शन घुलेची आधीपासूनच त्याच्या गावासह तालुक्यात दहशत होती. तो 3333 हा नंबर लकी मानायचा, सुधीर सांगळे याच्यासह त्याची जी गँग होती तीचं नाव देखील 3333 च होतं. एवढंच नाही तर घुलेने संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी जी गाडी वापरली होती, त्याच्या त्या गाडीचा नंबर देखील 3333 च होता.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.