अनैतिक संबंधांतून तरुणाची हत्या, पती-पत्नी अन् 2 प्रियकर, घटना ऐकून पोलिस चक्रावले

Satara Crime : साताऱ्यातील सोमंथळी येथे अनैतिक संबंधांच्या अडथळ्यातून एका 27 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.

अनैतिक संबंधांतून तरुणाची हत्या, पती-पत्नी अन् 2 प्रियकर, घटना ऐकून पोलिस चक्रावले
Crime Satara
Image Credit source: Google
| Updated on: Jan 23, 2026 | 7:12 PM

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या अडथळ्यातून एका 27 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश उर्फ आप्पा दादासो दडस असं हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आरोपींना अटक

फलटणमधील या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, या प्रकरणातील मयत व्यक्तीची हरवल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या चार तासात हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पती-पत्नी आणि दोन प्रियकर

या घटनेबाबत समोर आलेली माहिती अशी की, दोन व्यक्तींसोबत संबंधित महिलेचे अनैतिक संबंध होते. यातील पहिल्या प्रियकराचा खून करण्याच्या उद्देशाने पती आणि प्रियकराला सोबत घेऊन संबंधित महिलेने दुसऱ्या प्रियकरचा खून केला आहे. या घटनेची महिलेनी कबुली दिली आहे. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे.

नेमकं काय घडलं ?

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत सतीश दडस या तरुणाचे आरोपी महिलेशी अनैतिक संबंध होते. याच महिलेचे आणखी एका तरुणाशी अफेयर होते. सतिश या महिलेला ब्लॅकमेल करत असल्याती माहिती समोर आली आहे. त्यामुळे ती वैतागली होती. 14 जानेवारी अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा आरोपी महिला, तिचा पती आणि प्रियकरासोबत वाद झाला. यावेळी सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.

प्रेमाच्या त्रिकोणातून हत्या

सतीश दडसला दवाखान्यात नेण्याचा बनाव करत त्याला विडणीच्या मांगोबा माळ परिसरात नेले. या ठिकाणी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. यानंतर लाकूड कापण्याच्या कटरने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. हे तुकडे पोत्यात भरुन शेततळ्यात टाकण्यात आले तसेच काही तुकडे नीरा नदीत फेकून देण्यात आले. अशाप्रकारे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. सतीश दडस घरी न आल्यामुळे त्याच्या भावाने तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आता प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.