महिला डॉक्टर प्रकरणात लव्ह अँगल समोर, तिनं प्रपोजही केलं होतं पण…नव्या दाव्याने खळबळ!

सातारा महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. डॉक्टरने प्रशांत बनकर याला प्रपोज केले होते, असा दावा बनकर याच्या बहिणीने केला आहे.

महिला डॉक्टर प्रकरणात लव्ह अँगल समोर, तिनं प्रपोजही केलं होतं पण...नव्या दाव्याने खळबळ!
satara female doctor death case
| Updated on: Oct 25, 2025 | 4:55 PM

Satara Doctor Death Case : साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. याच प्रशांत बनकरच्या बहिणीने आता समोर येत खळबळजनक दावे केले ाहेत. मृत डॉक्टर महिला आमच्याकडे साधारण वर्षभरपासून राहात होत्या. मी एक ते दोन महिने आमच्या घरी राहायला आले होते. त्या काळात आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. मी त्यांना तुमचा जॉब सरकारी आहे. तुमचा जॉब खूप चांगला आहे, असं सांगायचे. पण त्या मात्र आमच्या जॉबमध्ये खूप तणाव आहे, असं सांगायच्या. त्या नेहमी तणावात दिसायच्या, अशी महत्त्वाची माहिती प्रशांत बनकर याच्या बहिणीने दिली.

महिला डॉक्टरने माझ्या भावाला प्रपोज केले

तसेच, याच महिन्यांत माझा भाऊ प्रशांत बनकर आठ दिवस आमच्या घरी राहायला आला होता. या काळात प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात आले. आम्ही ज्या पद्धतीने महिला डॉक्टरला बोलायचो तसेच माझा भाऊही त्यांना बोलायचा. महिला डॉक्टर माझ्या भावाला दादा म्हणायच्या. त्यानंतर माजा भाऊ पुण्याला गेला. त्यानंतर महिला डॉक्टरने माझ्या भावाला प्रपोज केले होते, अशी मोठी माहिती प्रशांत बनकर याच्या बहिणीने दिली.

माझ्या भावाने छळ केला असता तर…

तसेच पुढे बोलताना, माझ्या भावाने मात्र त्यांचे प्रेम नकारले. मी तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे समजतो. तुम्ही मला दादा म्हणता. तुम्ही समजताय तसे काही नाही, असे माझ्या भावाने सांगितले. त्याने नकार दिला होता, असा दावाही पुढे बनकर याच्या बहिणीने केला.
प्रशात बनकर डॉक्टर महिलेचा छळ करत होता असे सांगितले जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी डॉक्टर महिलेचे आईवडील आमच्या घरी आले होते. मग त्यावेळी डॉक्टरचे आईवडील आणि डॉक्टरने या छळाबद्दल काहीही का सांगितले नाही, असा सवाल विचारला.

पोलिसांनी कालपासून आम्हाला थांबवून ठेवलं

प्रशांत बनकर याच्या भावानेदेखील पोलिसांनी आम्हाला विनाकारण थांबवून ठेवल्याचा आरोप केला आहे. माझा भाऊ स्वत: पोलिसांत हजर झाला आहे. माझा भाऊ समोर येत नाही म्हणून पोलिसांनी काल सकाळपासूनच मला आणि माझ्या वडिलांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात थांबवून ठेवलेलं होतं, अशी माहिती आरोपी प्रशांत बनकर याच्या भावाने दिली आहे. दरम्यान, आता साताऱ्यातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात हा नवा अँगल समोर आल्यामुळे पोलीस या प्रकरणाचा छडा नेमका कसा लावणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.