सात ओळी, एक खाडाखोड, अन् रेप…महिला डॉक्टरच्या तळहातावर खळबळजनक संदेश, नेमकं दडलंय काय?

साताऱ्यातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवलं आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी या डॉक्टरने आपल्या तळहातावर सात ओळी लिहिल्या आहेत. यात बलात्काराचा उल्लेख असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सात ओळी, एक खाडाखोड, अन् रेप...महिला डॉक्टरच्या तळहातावर खळबळजनक संदेश, नेमकं दडलंय काय?
satara doctor death
| Updated on: Oct 24, 2025 | 3:07 PM

Satara Doctor Death Case : महाराट्रातील सातारा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. या महिला डॉक्टराने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यामध्ये पीएसएआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचे नाव आले आहे. दरम्यान, या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर सात ओळींची एक एक संदेश लिहून ठेवला आहे. याच सहा ओळींमध्ये महिला डॉक्टरने गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून यात बलात्काराची उल्लेख आहे. या आत्महत्ये संदेशाची आता चर्चा होत आहे.

विरोधकांचा संताप, लगेच चौकशी करण्याचा आदेश

आत्महत्या केलेली महिला डॉक्टर साताऱ्यातील फलटन उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर होती. या डॉक्टरने रात्री (23 नोव्हेंबर) रोजी एका हॉटेलमध्ये गळफास घेत स्वत:ला संपवलं आहे. तिने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं असून महिला डॉक्टरवर आत्महत्या करण्याची वेळच का येते? असा सवाल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉक्टरच्या तळहातावर नेमकं काय लिहिलेलं आहे?

साताऱ्यातील रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर एक सात ओळींचा एक संदेश लिहला आहे. या संदेशात तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांचे नाव घेतले आहे. यातील पहिल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने असे आहे. तर दुसऱ्या पोलिसाचे नाव प्रशांत बनकर असे आहे. आपल्या या संदेशात महिला डॉक्टरने एका ठिकाणी खाडाखोडही केली आहे. तसेच एका ठिकाणी रेप म्हणजेच बलात्काराचाही उल्लेख आहे. ‘माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ आहे. ज्याने माझा 4 वेळा रेप केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागच्या 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला,’ असे या तळहातावरील संदेशात महिला डॉक्टरने सांगितले आहे.

दरम्यान, महिला डॉक्टरने लिहिलेल्या आत्महत्येपूर्वीच्या संदेशानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.