AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ काम करायला कुठेही कमी पडणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळांना शब्द

सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना शब्द दिलाय. काय म्हणालेत, पाहा...

'हे' काम करायला कुठेही कमी पडणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळांना शब्द
| Edited By: | Updated on: Jan 03, 2023 | 3:17 PM
Share

नायगाव, सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती (Savitribai Phule Jayanti) आहे. जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केलंय. पुण्यातील भिडेवाड्याबद्दल अनेक बैठका घेतल्या. सगळया अडचणी दूर करुन भव्य स्मारक उभ करणार. दोन महिन्यांत त्याचं भूमिपूजन करायचं आहे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला आहे.

राज्यांमध्ये ओबीसी समाजाचं काम करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. हा शब्द मी भुजबळसाहेब तुम्हाला देतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

ओबीसी समाजासाठी कुठेच पैसे कमी पडू देणार नाही. भुजबळसाहेब आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. फुले दाम्पत्याने केलेली कामं सगळ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल, असा शब्द देतो, असंही ते म्हणालेत.

महाज्योतीची सगळे कामे करणार आहे.शक्ती कायदा नक्की पारित होईल असा शब्द मी देतो.  विधवा महिलांना सुद्धा काहीच कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे. त्याचं पालकत्व शासन नक्की घेईल याचा शब्द मी तुम्हाला देतो, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं.

भुजबळ साहेब यादी देखील आपण सरकार मध्ये काही कारणामुळे आपण काम करू शकलो नाही. पण आता सगळी कामं केली जातील, असं ते म्हणालेत.

सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती आहे. जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. नायगाव फुलं रांगोळ्यांनी सजलं. गावातील अनेक घरांवर गुडी उभारली आहे. नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकदेखील सजवण्यात आलं आहे. स्मारकाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतनिमित्त त्यांना अभिवादन करतो. महात्मा फुले यांना त्यांनी खंबीरपणे साथ दिली. स्मारकात त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊनच आपण राज्य कारभार करत आहोत. मंत्रालयात लावेल्या तैल चित्रामुळे आपल्याला प्रेरणा मिळत राहतील, असं ते म्हणाले आहेत.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.