AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदगावच्या आजीची कमाल; असा आदर्श कोण नाही घेणार! 65 व्या वर्षी रस्त्यावरून पळवते बुंगाट रिक्षा

Old Woman Auto Ricksha Driver : आयुष्याच्या उतारवयात 65 वर्षीय आजीची प्रवाशी रिक्षा ट्रॅफिक मधूनही बुंगाट पळते, या आजीचा आदर्श सर्वांनीच घेण्यासारखा आहे. कोण आहे ही आजी? का चालवते या वयात रिक्षा...

नांदगावच्या आजीची कमाल; असा आदर्श कोण नाही घेणार! 65 व्या वर्षी रस्त्यावरून पळवते बुंगाट रिक्षा
आजीबाईची कमालImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Apr 22, 2025 | 3:00 PM
Share

परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते असे म्हणतात. शिकणाऱ्याला वयाचे बंधन नसते. कोणतीही कुरकुर न करता परिस्थितीशी दोन हात करणारे लोक आपल्या समाजासाठी आदर्शच असतात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील नांदगावच्या 65 वर्षीय आजी मंगल आवळे या मुलाला संसारात हातभार लागावा आणी घरी बसून आजारी पडण्यापेक्षा प्रवाशी रिक्षा चालवत आहेत.

गर्दीतही बुंगाट पळवतात रिक्षा

टू व्हीलर असो फोर व्हीलर ती चालवताना महिलांना कसरत करावी लागते..काही महिला सरावाने सराईतपणे वाहने चालवतात.. तरीही मनात धाकधूक असतेच..मात्र कराड तालुक्यातील नांदगाव येथील 65 वर्षीय आजी गर्दीतूनही बुंगाट रिक्षा चालवतात. कसलीही भीती न बाळगता या आजी सहज रिक्षा चालवताना पाहून भलेभले तोंडात बोट घालतात. कराड तालुक्यातील नांदगाव येथील मंगल आबा आवळे या 65 वर्षीय आजी आपल्या मुलाला हातभार लागावा यासाठी रिक्षा चालवतात.

त्याच झाल्या कुटुंबाचा आधार

मंगला आवळे यांचे पती मुले लहान असतानाच हे जग सोडून गेले तेव्हापासून त्या मोलमजुरी करून तीन मुली व एका मुलगा असा चार मुलांचा सांभाळ करत होत्या. मुलगा मोठा होऊन एसटीमध्ये चालक म्हणून काम करत आहे. मुलींची लग्न झाली असून मुलाचाही संसार चौकोनी झाला आहे. मुलाच्या संसाराला हातभार लावावा स्वत:च्या औषध पाण्याचा खर्च निघावा, या उद्देशाने सुरुवातीपासूनच कष्टात आयुष्य घालवलेल्या मंगला आवळे या आजीने मुलाकडून रिक्षा शिकून घेऊन रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

मुलाने शिकवली रिक्षा

आजीचे आज 65 वर्ष वय आहे. त्यांना शुगरचा त्रास आहे. या आजीला त्यांच्या मुलाने रिक्षा चालवणे शिकवले. त्या गेल्या 15 दिवसांपासून रिक्षा चालवतात. गर्दीतही अगदी सफाईदारपणे त्या रिक्षा वळवतात. नियमानुसार, व्यवस्थित रिक्षा चालवतात. त्यांचे हे कौशल्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आपल्या मुलाच्या संसाराला हातभार लागावा तसेच आपली आवड ही जोपासता यावी यासाठी या आजीने हे धाडस केलं आहे.

कराड- उंडाळे या मार्गावर आजी प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्या रिक्षात प्रवासीही बिनधास्त बसत असून सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत त्या रिक्षा चालवतात. खर्च वजा जातात त्यांना दररोज 500 ते 700 रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आजीच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे वयोवृद्ध नागरिक व मुली महिलांसाठी त्या आदर्श असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. सुरुवातीपासून कष्टात आयुष्य घालवलेल्या आमच्या आईच या वयातील शिकण्याची व काम करण्याची उमेद व हे काम करताना तिला होत असलेला आनंद व धाडस पाहून आम्हाला समाधान व अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांचा मुलगा घनश्याम आवळे यांनी दिली

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.