AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता भांग पिल्यासारखी, अंगात आली की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो, सदाभाऊ खोत यांची टीका

आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही. एक अॅब्युलन्स दिली गेली नाही. याची नाराजी माझ्या मनात असल्याची भावना मंत्री महोदयांसमोर सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवली.

सत्ता भांग पिल्यासारखी, अंगात आली की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो, सदाभाऊ खोत यांची टीका
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: May 26, 2023 | 8:54 PM
Share

दिनकर थोरात, प्रतिनिधी, सातारा : कराड ते सातारा अशी चार दिवस झालेल्या शेतकरी पदयात्रेत पालक मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी काही सोय केली नाही. कालच्या समारोप सभेत प्रवीण दरेकर, सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली होती. सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हे माहीत नाही. मात्र तो भाग्यवान माणूस आहे हेसुद्धा माहीत नाही. शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. मात्र पालकमंत्री यांनी साधा एक‌ फोन केला नाही. आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही. एक अॅब्युलन्स दिली गेली नाही. याची नाराजी माझ्या मनात असल्याची भावना मंत्री महोदयांसमोर सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवली.

तसंच सत्ता भांग पिल्यासारखी असते. अंगात आले की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो. मात्र नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असते, अशी जहरी टीका सुद्धा शंभुराज देसाई यांच नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी केली.

सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा पलटवार

पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सदाभाऊ खोत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. सदाभाऊच भांग पित असतील. यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. असा टोला शंभुराज देसाई यांनी लागवला. आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती. सर्व प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले होते, असं सुद्धा शंभुराज देसाई यांनी सांगितलंय.

सदाभाऊ खोत आणि शंभूराज देसाई यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. सत्ता ही भांग पिल्यासारखी असते. सत्ता मिळाल्यावर काही लोकं डुलायला आणि नाचायला लागतात. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी त्यांना प्रत्युतर दिलंय. त्यामुळे आता आणखी हा वाद किती वाढतो ते बघावं लागेल.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल