नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी मार्ग रोखला, आंदोलन आणखी पेटलं; ताब्यात घेतल्यानंतर सत्यजित तांबेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
सिन्नरमध्ये आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखला. त्यानंतर पोलिसांनी सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलं. यानंतर तांबे यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केलं.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं आहे. या प्रकल्पाचा मार्ग बदल्यावरून बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे आणि आंदोलकांनी आक्रक भूमिका घेतली आहे. आंदोलक सकाळी 9 वाजताच रस्त्यावर उतरले. त्यानंतर आंदोलकांनी समृद्धी मार्गावर पोहोचून महामार्ग रोखला. आंदोलन पेटल्यानंतर पोलिसांनी आमदार सत्यजित तांबेंना ताब्यात घेतलं. त्यानंतर सत्यजित तांबेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. रेल्वे मार्गासाठी सुरू असलेलं जनआंदोलन थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी अहिल्यानगरमध्ये आज चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी हजारो आंदोलन रस्त्यावर उतरल्याचे दिसून आलं. आंदोलकांनी चाकणपासून सिन्नरपर्यंत चक्काजाम केला. आंदोलकांनी समृद्ध महामार्ग देखील रोखला. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. आंदोकांनी नारायणगावमधील जीएमआरटीचे कारण देऊन रद्द करण्यात आलेला मार्ग पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गावर सत्यजीत तांबे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलं.
चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्ग वाहतुकीवर आज मोठा परिणाम पाहायला मिळाला. काही वेळासाठी नाशिक-पुणे महामार्ग ठप्प झाला. यामुळे पोलिसांनी आदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी पोलिसांनी सत्यजित तांबे यांनाही ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सत्यजित तांबे म्हणाले,’ पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करत राहणार. हे जनआंदोलन असून हे थांबणार नाही. जोपर्यंत नाशिक-पुणे आंदोलन सरळ मार्गाने जाणार नाही. आंदोकांनी सर्व शांततेत घ्यावं. आंदोलकांनी जास्त आक्रमक भूमिका घेऊ नये. आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं’ .
आंदोलनात झाली होती गोंधळाची स्थिती
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने करावी, या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन सुरू झालं. त्यानंतर आंदोलनात काही वेळात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवण यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. यावरून सर्व पक्षीयांनी सोनवणे यांना वैयक्तिक टीका करण्यापासून रोखलं. पुणे-नाशिक रेल्वे अहिल्यानगर मार्गे होत आहे, केंद्रात अमोल कोल्हे हे पाठपुरावा करण्यात कमी पडले, असा आरोप सोनवणे करु लागले. त्यामुळं हा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र अशा वैयक्तिक टीकेपासून त्यांना रोखण्यात आलं आणि आंदोलन पुढं सुरु झालं.