अशी करा घरातील ज्येष्ठांसाठी गुंतवणूक आणि करामध्ये मिळवा सूट

पोस्ट खात्यातंर्गत खातेधारकांना अनेक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खातेदाराला ज्येष्ठ नागरिकासाठी बचत ही करता येते आणि त्याला कर सवलतही मिळते. या योजनेविषयी जाणून घेऊयात.

अशी करा घरातील ज्येष्ठांसाठी गुंतवणूक आणि करामध्ये मिळवा सूट
बचतीसह कर सवलत हीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 12:20 PM

जर आपण ही येत्या काही दिवसांमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, पोस्ट खात्याच्या (Post Office) अल्पबचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) तुम्ही गुंतवणूक करु शकता. या योजनांना सरकारचे संरक्षण तर आहेच, पण ठेवीदाराला या योजनेत चांगला परतावा ही मिळतो. बँक दिवाळखोरीत जाण्याची आणि तुमची रक्कम बुडण्याची (Default) दाट शक्यता असते. तुम्हाला फार फार तर पाच लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेची हमी मिळते. परंतू, पोस्ट खात्यात हा बुडवण्याचा विषय नाही. तुमची कोणती ही रक्कम अक्कलखात्यात जात नाही. उलट तुम्हाला बचतीवर चांगला परतावा तर मिळतोच. उलट कर बचतीची संधी (Tax Saving) ही मिळते. टपाल खात्याच्या अल्पबचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अशी संधी तुम्हाला मिळवून देते. चला तर या योजनेविषयी जाणून घेऊयात.

काय आहे व्याजदर

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) सारख्या योजनांमध्ये 7.4 टक्के व्याजदर मिळत होते, ते पुढे ही कामय आहे.60 वर्षांवरील लोक गुंतवणूक करू शकतात. किमान एक हजार रुपये किंवा त्याच्या पटीत आणि जास्तीत जास्त वार्षिक दीड लाख रुपये खात्यात जमा होऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात आली आहे. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 रोजीपासून लागू आहेत. या योजनेत व्याजाची रक्कम 31 मार्च वा 30 सप्टेंबर अथवा 31 डिसेंबर रोजी जमा करण्यात येते. व्याजाची रक्कम त्या दिवशी ग्राहकाच्या खात्यात जमा करण्यात येते.

गुंतवणूक रक्कम

ज्येष्ठ नागरिक अल्पबचत योजनेत खातेधारकाला एक हजार रुपयांच्या पटीत केवळ एकदाच रक्कम जमा करता येते. गुंतवणुकीची रक्कम 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नसते.

हे सुद्धा वाचा

खाते कोण उघडू शकते

पोस्ट खात्याच्या ज्येष्ठ नागरिक अल्पबबचत योजनेत सहभागी होण्यासाठी 60 वर्षांवरील कोणताही व्यक्ती खाते उघडू शकते. तसेच 55 वर्षांपेक्षा अधिक 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा कर्मचारी या योजनेत सहभाग नोंदवू शकतो. कर्मचा-याला निवृत्ती लाभांच्या एक महिन्यापूर्वी या योजनेत रक्कम गुंतवावी लागते. तसेच 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा संरक्षण दलातील कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करु शकतो. या कर्मचा-यांनीही निवृत्ती लाभ मिळण्यापूर्वी या योजनेत गुंतवणूक करणे क्रमप्राप्त आहे. या योजनेत वैयक्तिक अथवा पती-पत्नीच्या नावे खाते उघडता येते. योजनेनुसार, जमा करण्यात आलेली रक्कम केवळ पहिल्या खातेधारकाची मानण्यात येईल.

योजनेचा कालावधी

या योजनेत खाते उघडल्यानंतर पाच वर्षात खाते बंद करता येते. त्यासाठी खातेधारकाला संबंधित पोस्ट खात्यात यासंबंधीचा अर्ज दाखल करावा लागतो. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मृत्यू दिनाकांपासून त्याच्या खात्यावर टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेच्या व्याजदरानुसार व्याज प्राप्त होईल. तुमचा जीवनसाथी एकमेव वारसदार असेल तर खाते कालावधी पूर्ण होईपर्यंत सुरु ठेवता येते. परंतू, तुमच्या जीवनसाथीकडे या योजनेत दुसरे खाते सुरु नसावे ही अट लागू आहे.

कर सवलत

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक कर बचतीच्या टप्प्यात येते. प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत या बचतीवर नागरिकाला कर सवलत मिळते.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.