अंबरनाथमध्ये दुकानदाराला सात लाखांचं वीजबिल! विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचा महावितरणचा आरोप

| Updated on: Mar 12, 2022 | 11:09 AM

महावितरणने केलेले वीजचोरीचे आरोप खोटे असल्याचं दुकानदार केतन मोटा यांचं म्हणणं आहे. आपण मीटरसोबत कोणतीही छेडछाड केलेली नसून उलट बिल सुद्धा वेळच्यावेळी भरत असल्याचं त्यांनी सांगितलं.

अंबरनाथमध्ये दुकानदाराला सात लाखांचं वीजबिल! विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचा महावितरणचा आरोप
दुकानदार राहत असलेली इमारत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अंबरनाथ – अंबरनाथमध्ये (ambernath) एका दुकानदाराला चक्क सात लाखांचं वीजबील (Electricity bill) महावितरण कडून पाठवण्यात आलं असल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे. इतकं वीज बिल कसं काय येऊ शकत ? असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल. परंतु हे प्रकरण खरं असून संबंधित दुकानदारानं विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचा महावितरणचा आरोप केला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या नवरेनगर परिसरात केतन मोटा (ketan mota) यांचं दुकान आहे. महावितरणच्या भरारी पथकानं धाड टाकत त्यांच्या मीटरची तपासणी केली असता, त्यात छेडछाड करून हे मीटर संथ गतीने करण्यात आल्याचं भरारी पथकाला आढळून आलं. हे कधीपासून संथगतीने मीटर सुरू असल्याची चौकशी अधिका-यांनी केल्यानंतर त्यांना वीज बील पाठवण्यात आलं आहे.

वीजचोरी केल्याचा महावितरणचा आरोप आहे

अंबरनाथ पूर्वेच्या नवरेनगर परिसरात केतन मोटा यांचं ‘केतन ग्रेन स्टोअर’ नावाचं दुकान आहे. केतन मोटा यांचं 14 नंबर बिल्डिंगमध्ये स्वतःचं घर आहे. या दोन्ही ठिकाणी महावितरणच्या भरारी पथकानं धाड टाकत त्यांच्या वीज मीटरची तपासणी केली असता, त्यात छेडछाड करून हे मीटर संथ गतीने करण्यात आल्याचं भरारी पथकाला आढळून आलं. त्यामुळं ही वीजचोरी कधीपासून सुरू आहे. याचा तपशील काढून महावितरणने त्यांना दुकानाच्या मीटरवर साडेतीन लाख आणि घरच्या मीटरवर साडेतीन लाख असं एकूण सात लाख रुपयांचं वीजबिल पाठवलंय. तसेच हे बिल न भरल्यास वीज कायदा २००३ कलम १३५ नुसार मोटा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेंद्र कलंत्री यांनी दिली आहे.

महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेंद्र कलंत्री

माझ्यावर अन्याय झाल्याचं दुकानदारचं म्हणणं

महावितरणने केलेले वीजचोरीचे आरोप खोटे असल्याचं दुकानदार केतन मोटा यांचं म्हणणं आहे. आपण मीटरसोबत कोणतीही छेडछाड केलेली नसून उलट बिल सुद्धा वेळच्यावेळी भरत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच लॉकडाऊनमध्ये दुकान बंद असूनही पूर्ण बिल भरल्याचं देखील दुकानदारांचं म्हणणं आहे. माझ्यावर अन्याय झाला असून हे वीज बील माफ करावं अशी मागणी दुकानदार केतन मोटा यांनी केली आहे.

दुकानदार केतन मोटा

CCTV Video: पुण्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुंडागर्दी, वाहनांची पुन्हा तोडफोड, सीसीटीव्हीत घटना कैद

नाल्यात पोहताना दोन विद्यार्थ्यांचा बुडाले, मित्र पळून गेले, रात्री मृतदेह सापडले

Fact Check : घरात चार्जिंगला लावलेल्या स्कूटर बाइकचा स्फोट, स्फोट नक्की कशानं? पाहा Video