AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : घरात चार्जिंगला लावलेल्या स्कूटर बाइकचा स्फोट, स्फोट नक्की कशानं? पाहा Video

Scooter blast : एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय, तो म्हणजे या स्कूटर ब्लास्टचा.. घरात पार्क केलेली स्कूटर दिसत आहे आणि त्यातच अचानक स्फोट होतो, असे व्हिडिओत दिसत आहे.

Fact Check : घरात चार्जिंगला लावलेल्या स्कूटर बाइकचा स्फोट, स्फोट नक्की कशानं? पाहा Video
घरात चार्जिंगला लावलेल्या स्कूटर बाइकचा स्फोट
| Updated on: Mar 12, 2022 | 12:37 PM
Share

Scooter blast : स्कूटरचा स्फोट झाल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. तसे तर आजकाल सोशल मीडियावर अनेकप्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडिओ एखाद्या घटनेशी संबंधित असतात. मात्र अनेकवेळा व्हायरल व्हिडिओमधील घटना खऱ्या असतात, तर काही व्हिडिओ प्रँक स्वरुपातले असतात. आपण असे व्हिडिओ अनेकवेळा पाहतो आणि डोळे झाकून फॉरवर्ड करतो. मात्र त्यातली सत्यता तपासत नाहीत. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय, तो म्हणजे या स्कूटर ब्लास्टचा.. घरात पार्क केलेली स्कूटर दिसत आहे आणि चार्जिंगला ती लावलेली आहे. त्यातच अचानक स्फोट होतो, असे व्हिडिओत दिसत आहे. स्कूटर आणि व्हिडिओत दिसणारी व्यक्ती पाहता हा व्हिडिओ भारतातला नसावा, असे दिसते. मात्र स्फोट झाल्यानंतर कशाप्रकारे त्या व्यक्तीची धावपळ होते, हे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

…आणि होते धावपळ

जवळपास एक मिनिटांची ही व्हिडिओ क्लिप आहे. सीसीटीव्ही फूटेज असल्याचे व्हिडिओ पाहून लक्षात येते. 31 डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे. घरात एक स्कूटर पार्क केलेली आहे. बहुधा तिला चार्ज केले जात असावे असे दिसते. घरात एक व्यक्ती फिरताना दिसत आहे. अचानक हा स्फोट होतो. त्यानंतर त्या व्यक्तीची धावपळ होते. चार्जिंगमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता दिसते. हा व्हिडिओ गुगल तसेच इतर सर्च इंजिनवर शोधला असता याची माहिती तर उपलब्ध होऊ शकली नाही. हा कुठला व्हिडिओ आहे, याबद्दलही माहिती नाही. मात्र प्रथमदर्शनी तो भारतातला नसावा, असे दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एखाद्या अपघाताशी संबंधित काही मजकूर असेल तर तो लोकांना वाचायला, पाहायला जास्त आवडते. व्हिडिओतली तीव्रता पाहता तो लगेच फॉरवर्डही केला जातो. आपल्याकडेही असे अनेक अपघात होतात. त्याचे कोणीतरी आपल्या मोबाइलमध्ये शूटिंग करते आणि ते व्हायरल केले जाते. मात्र हे करत असताना त्यासंबंधीची माहिती दिली जात नाही. त्यामुळे घटनेमागचे गांभीर्यच निघून जाते. असेच काहीसे या व्हिडिओच्या बाबतीतही झालेले दिसते.

आणखी वाचा :

Video: हे कुठलंच टेक्स्ट बुक नाही शिकवू शकलं असतं, ‘कोविड बॅच’ म्हणून हिणवणाऱ्यांना जोर का झटका

Viral Video | हुशार पोपटाची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Viral Video | तरुणाचा जीवघेणा स्टंट, नेटिझन्सलाही आला घाम, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.