पुढील 3 तास धोक्याचे, प्रशासनाचा मोठा इशारा, राज्यावर आसमानी संकट, थेट..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच राज्यावर मोठं संकट आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही तास धोक्याची असणार आहेत.

पुढील 3 तास धोक्याचे, प्रशासनाचा मोठा इशारा, राज्यावर आसमानी संकट, थेट..
Unseasonal rains
| Updated on: Apr 21, 2026 | 7:12 AM

राज्यावर पावसाचे सावट कायम आहे. आज मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. काही भागात पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. वर्धा आणि अमरावती येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. आज गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेती पिक धोक्यात आली. सतत पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे. राज्यावर दुहेरी संकट आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती बघायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेचाही मोठा इशारा देण्यात आला. यासोबतच पुढील 3 तासात मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर येथील काही भागात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

काल अनेक भागात पावसाने हजेरी लावली. नांदेड, हिंगोली, धाराशिव, सांगली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. एकीकडे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट आली तर दुसरीकडे मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आलेल्या उष्णतेच्या लाटेला ब्रेक लागला.

मराठवाड्यात पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून तशी 30 ते 40 किलोमीटर वेगानेवादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे, तर संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा घसरून सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Follow Us