महाराष्ट्रातील या गावात स्मशानभूमीच नाही; भर पावसात ताडपत्री धरून करावे लागतायत अंत्यविधी

प्रत्येक गावाता एक तरी स्मशानभूमी असायलाच हवी, पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे, जेथे स्मशानभूमीच नाही. भर पावसात ताडपत्री धरुन अंत्यविधी करायला लागतात, तर जाणून कोणतं आहे ते गाव आणि कशी आहे तेथील परिस्थिती...

महाराष्ट्रातील या गावात स्मशानभूमीच नाही; भर पावसात ताडपत्री धरून करावे लागतायत अंत्यविधी
Shahapur
| Updated on: Aug 12, 2026 | 1:00 PM

ठाणे येथील आदिवासी वसाहत असलेल्या शहापूर येथील उंभरई गावातील एक हृदयद्रावक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये दिसतंय की, अंत्यसंस्कार उंभरई गावात होत आहेत. पण तेथे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ग्राम पंचायत समितीच्या सदस्या जयाबाई महादू वाघ यांचं निधन झालं. अशात गावात स्मशान नसल्यामुळे त्यांच्यावर मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळत होता, अशात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत असल्यामुळे गावकऱ्यांनी ताडपत्रीचा उपयोग करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, जयाबाई महादू वाघ यांचं आजाराने निधन झालं. पण स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांच्यावर एका मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयाबाई महादू वाघ यांच्यावर एका मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर चिता जळण्यास अनेक समस्या येऊ लागल्या. तेव्हा गावकरी ताडपत्री घेऊन उभे राहिले. पाऊसाचं पाणी मृतदेहावर पडू नये आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी ताडपत्रीच्या सहाय्याने प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांची तक्रार आहे की, त्यांच्या उंभरई गावात एकही स्मशानभूमी नाही. गेल्या 2 वर्षांपासून गावकरी प्रशासनाकडे स्मशानभूमीची मागणी करत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी शहापूरचे तत्कालीन तहसीलदार परमेश्वर काळुसे यांनी स्मशानभूमीसाठी गावातील एका जागेची पाहणी केली होती. त्यावेळी स्मशानभूमीचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असं आश्वासन देण्यात आले होते; मात्र, ग्रामस्थांच्या मते हा प्रश्न आजही प्रलंबित आहे.

एकीकडे शहापूरमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे अनेक आदिवासी वस्त्या रस्ते, पाणी, वीज, आरोग्यसेवा आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करत आहेत. जयाबाई महादू वाघ यांच्या अंत्यसंस्काराचे दृश्य प्रशासन आणि राजकीय नेत्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण करते. गावकऱ्यांची मागणी आहे की, स्मशानभूमीसोबतच पक्क रस्ते आणि अन्य सुविधा देखील उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us