AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ शांताबाई फेम संजय लोंढे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ लोककलावंत गायक शांताबाई फेम संजय लोंढे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ शांताबाई फेम संजय लोंढे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार
संजय लोंढे, गायक
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 8:17 AM
Share

पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ लोककलावंत गायक शांताबाई फेम संजय लोंढे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 16 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर कलाकारांचं इनकमिंग सुरु होणार असल्याची चर्चा आहे.

संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार करणार आहेत. येत्या 16 तारखेला मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार कलाकारांकरिता काम करण्याची इच्छा संजय लोंढे यांनी बोलून दाखवली आहे.

संजय लोंढे यांचं शांताबाई हे गीत खूपच लोकप्रिय झालं. सगळ्या महाराष्ट्राने त्यांचं गीत डोक्यावर घेतलं. काही दिवसांत ते तुफान लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांना गाण्याच्या, कार्यक्रमाच्या अनेक सुपाऱ्या मिळाल्या. पण दरम्यानच्या काळत त्यांची लोकप्रियता कमी झाली किंबहुना ती घटली… आता पुन्हा एकदा संजय लोंढे प्रसिद्धच्या झोतात आले आहेत.

सुरेखा पुणेकरांबरोबर 12 कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा होणार आहे. सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण 12 कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे.

लावणी सम्राज्ञी म्हणून सुरेखा पुणेकरांची ओळख आहे. लावणीला महाराष्ट्रासह परदेशातही त्यांनी मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी पायात घुंगरू बांधलं आणि लावणी कार्यक्रमांना सुरुवात केली. नटरंगी नार हा त्यांचा कार्यक्रम राज्यभरात सगळीकडे गाजला. या रावजी तुम्ही बसा भावजी , पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, कारभारी दमानं या त्यांच्या लावण्या खूप गाजल्या आहेत. 2019 ला पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. तर बिग बॉस या स्पर्धेतही त्या सहभागी झाल्या होत्या. अखेर त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत संजय लोंढे?

संजय लोंढे लोककलावंत, गायक आहेत.

‘शांताबाई’ हे त्यांनी गायलेलं गीत खूपच प्रसिद्ध झालं

संपूर्ण महाराष्ट्राने शांताबाई गीत डोक्यावर घेतलं, त्यांना दरम्यानच्या काळात अमाप प्रसिद्धी मिळाली.

पुण्यात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म, सध्याही गरिबीत दिवस व्यतित करतायत, पण राजकारणात येऊन कलावंतांसाठी काम करण्याची इच्छा

(Shantabai Fame artist Singer Sanjay londhe Will Join NCP)

हे ही वाचा :

Surekha Punekar | लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

शांताबाई फेम लोककलावंत Sanjay Londhe वर उपासमारीची वेळ, Corona ने काम हिरावलं

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.