AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांची अजित पवारांवर टीका, म्हणाले ही फसवणूक आहे

टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याच पंक्तीत ते जाऊन बसले. ही फसवणूक आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ही टीका केली.

शरद पवार यांची अजित पवारांवर टीका, म्हणाले ही फसवणूक आहे
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 15, 2024 | 5:24 PM
Share

शरद पवार यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, प्रत्येकाला कुठेही काम करण्याचा अधिकार आहे. त्या भागाचं भलं करायचं असेल. काम करायला कोणी पुढे येत असेल तर तक्रार करायचं काम नाही. पण विचारधारा वेगळी असेल तर… आम्ही कुणाशी संघर्ष करत होतो. त्यांच्या विरोधात अजित पवार निवडणूक लढले आणि त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसले ही फसवणूक आहे. ज्यांच्यासोबत ते लोक गेले त्यांच्याशी आमचं असोसिएशन नाही. कारण आमची आयडॉलॉजी वेगळी आहे.’

शरद पवार म्हणाले की, बसता कुणासोबत, शक्ती कुणाला देता, त्याचा लाभ कुणाला मिळतो. ज्यांच्यासोबत बसला त्यांना लाभ मिळत आहे. लाभ घेणाऱ्यांची भूमिका राष्ट्रवादी नाही. दहा वर्षापूर्वी मी सांगितलं की डायरेक्ट निवडणूक मी लढवणार नाही. मी २०१४ पासून उभा राहिलो नाही. मी राज्यसभेचा प्रतिनिधी आहे. प्रत्यक्षात लोकांमध्ये निवडणूक लढवणं १९६७ साली मी पहिली निवडणूक लढवली. मला ५६ वर्ष झाली. पक्षाचं काम करावं, संसदेत लोकांमधून डायरेक्ट निवडून येणं हा जसा मार्ग आहे, तसा दुसरा मार्ग आहे. त्यानुसार काम करू शकतो. मी राज्यसभेतच आहे. त्यासाठी मला डायरेक्ट निवडणूक लढवावी लागली नाही. रिटार्यमेंट कुठे. पण निवडणुकीला उभं राहायचं नाही.

‘मोदींचं काय म्हणणं आहे समजतं. आमच्या घरात जागेवरून सत्तेवरून मतभेद आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. सुप्रिया सुळे चारवेळा निवडून आली. त्या ठिकाणी दुसरे जे उभे राहिले त्यांचा त्या जागेवर दावा नव्हता. सुप्रिया सुळे यांना विधानसभेत इंटरेस्ट नाही. मोदी सांगतात ते खरं नाही. त्यांनी खरं बोललं पाहिजे. पंतप्रधान पद ही संस्था आहे. त्यांनी जपून बोलावं. कोणतंही विधान करणं म्हणजे आपल्या पदाची प्रतिष्ठा न राखणं आहे. त्यांनी जपून बोललं पाहिजे.’ असे ह शरद पवार म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी