AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार पुन्हा हॉस्पिटलमध्ये, कारण काय? प्रकृतीबाबत ताजी अपडेट समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या आठवड्यात छातीत संसर्ग झाल्यामुळे उपचार घेतल्यानंतर, आज ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुन्हा एकदा नियोजित आरोग्य तपासणीसाठी गेले आहेत.

शरद पवार पुन्हा हॉस्पिटलमध्ये, कारण काय? प्रकृतीबाबत ताजी अपडेट समोर
sharad pawar
| Updated on: Feb 16, 2026 | 12:43 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. शरद पवार आज पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे सविस्तर तपासणी करण्यासाठी जाणार आहे.. गेल्या आठवड्यात छातीत संसर्ग आणि खोकल्याच्या त्रासामुळे शरद पवार यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना उपचार पूर्ण करून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना नियोजित फॉलोअप तपासणी (Routine Follow-up) करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याच तपासणीसाठी आज ते रुग्णालयात जाणार आहे.

काही दिवस विश्रांतीचा सल्ला

शरद पवार यांना दुसऱ्या आठवड्यात सततचा खोकला आणि श्वसन घेण्यास त्रास होत होता. या त्रासामुळे त्यांना बारामतीहून तातडीने पुण्याला हलवण्यात आले होते. तिथे त्यांना पाच दिवसांचा अँटिबायोटिकचा कोर्स पूर्ण करण्यात आला. यानंतर शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाली असली तरी वय आणि कामाचा व्याप लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यासोबत डॉक्टरांनी त्यांना पुन्हा एकदा तपासणीचा सल्ला दिला होता.

शरद पवार पुन्हा काम कधी सुरु करणार?

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट आणि डॉ. अभिजित लोढा यांच्या नेतृत्वाखालील टीम आज शरद पवांराच्या प्रकृतीची तपासणी करणार आहेत. शरद पवार यांचे सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स (Vitals) सध्या सामान्य आहेत. छातीतील संसर्ग आता पूर्णपणे बरा झाला आहे. ही केवळ ‘प्रिव्हेंटिव्ह चेकअप’ची पायरी असून जेणेकरून ते पुन्हा सक्रिय कामाला सुरुवात करू शकतील, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान रुग्णालयात तपासणीसाठी येत असताना, इतर रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तपासणीनंतर शरद पवार काही काळ पुण्यातच विश्रांती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर ते त्यांच्या पूर्वनियोजित राजकीय दौऱ्यांकडे वळतील, अशी माहिती समोर येत आहे.

विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?.
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका.
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार.
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर....
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर.....
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला.
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?.
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल.
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप.
पुन्हा स्वगृही यावं, लढाईचं रणशिंग फुंकावं! राऊतांची गणेश नाईकांना ऑफर
पुन्हा स्वगृही यावं, लढाईचं रणशिंग फुंकावं! राऊतांची गणेश नाईकांना ऑफर.
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?.