AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar on Maratha Reservation: …तर महाराष्ट्रातही शक्य; शरद पवारांचं मोठं वक्तव्य! मराठा आरक्षणाचा पर्याय सांगितला

Sharad Pawar on Maratha Reservation: नुकताच शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, 72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते तर घटनेत बदल करता येऊ शकतो असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतला आहे.

Sharad Pawar on Maratha Reservation: ...तर महाराष्ट्रातही शक्य; शरद पवारांचं मोठं वक्तव्य! मराठा आरक्षणाचा पर्याय सांगितला
Sharad pawar and jarangeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 30, 2025 | 2:01 PM
Share

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांनी हजेरी लावली आहे. संपूर्ण राज्यभरातून हे आंदोलक आले आहेत. मुंबईमध्ये एक भगव वादळ आलं असल्याचे दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात मराठा समाजाच्या आरक्षाविषयी बोलताना ते म्हणाले, 72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये (Tamilnadu Reservation) होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल (दुरुस्ती) करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटू शकतो.

वाचा: आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन; रोहित पवारांचे गंभीर आरोप

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याबाबत आपली भूमिका जाहीर करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गाने जावे लागेल असा एक विचार आहे. केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याचा वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. विकासाच्या नावाखाली शेतीच्या जमिनी कमी होत आहेत. तर शेतीवर अवलंबून घटक वाढत आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींचा विचार करून शेती केली पाहिजे. शेतीत AI चा वापर करायला हवा. रयत शिक्षण संस्थेने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना जनतेने देखील सहकार्य करणे गरजेचे आहे असे शरद पवार म्हणाले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा