गप्प बसवत नाही म्हणून मी सर्वात आधी येतो! संकटकाळातील दौऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवारांचं मिश्किल उत्तर

राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी शरद पवार हे सर्वात आधी घटनास्थळावर पोहोचतात. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिलं.

गप्प बसवत नाही म्हणून मी सर्वात आधी येतो! संकटकाळातील दौऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवारांचं मिश्किल उत्तर
खरंतर, शरद पवार हे मराष्ट्रातल्या राजकारणातलं मोठं नाव आहे. ते 79 वर्षांचे आहेत. पण तरीदेखील एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने ते आजही काम करतात.

उस्मानाबाद: राज्यात भूकंप, अतिवृष्टी किंवा अन्य कुठलंही संकट असो… अशा संकटात शरद पवारच घटनास्थळावर सर्वात आधी कसे पोहोचतात?, असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी मला गप्प बसवत नाही म्हणून मी येतो, असं मिश्किल उत्तर दिलं आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील जनता स्थानिक पातळी, विधानसभा, लोकसभा अशा सगळ्या ठिकाणी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. आता संकटकाळी मी शांत कसा बसू? लोकांचा विश्वास माझ्यावर असल्यामुळेच मला स्वस्थ बसवत नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले.  (Sharad Pawar on osmanabad visit)

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार कालपासून उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार यांनी ‘ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागतं’, असं उत्तर देत वेळ मारुन नेली. कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका ठिकाणी बसा, आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंती केल्याचंही पवारांनी सांगितलं. आम्हा सर्वांच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्वीकारल्याचं पवारांनी यावेळी आवर्जुन मात्र, अतिवृष्टीमुळं आलेलं संकट मोठं असल्यानं मुख्यमंत्रीही आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचंही पवार सांगायला विसरले नाहीत.

अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शरद पवार कालपासून उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तुळजापूर, काक्रंबा, लोहारा, सास्तूर अशा अनेक भागांची पाहणी केली. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवादही साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा शरद पवार यांच्यासमोर मांडल्या आणि सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी केली.  त्यावर राज्य सरकारशी चर्चा करुन तातडीनं काही उपयायोजना करता येते का ते पाहू. तसंच मदतीसंदर्भात केंद्र सरकारशीही चर्चा करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. राज्यातील खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील नुकसानाची त्यांना माहिती देणार असल्याचंही पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान, राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी- धनंजय मुंडे

प्रचंड कष्ट, लोकांचं प्रेम आणि शरद पवार या गोष्टी कधीही वेगळ्या न करता येण्याजोग्या : रोहित पवार

Sharad Pawar on osmanabad visit

 

Published On - 9:29 am, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI