‘नरेंद्र मोदींनी माफी मागावी’, टीव्ही 9च्या मुलाखतीत शरद पवारांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांनी मोदींनी माफी मागावी, अशी मागणी केली.

'नरेंद्र मोदींनी माफी मागावी', टीव्ही 9च्या मुलाखतीत शरद पवारांची मागणी
'नरेंद्र मोदींनी माफी मागावी', टीव्ही 9च्या मुलाखतीत शरद पवारांची मागणी
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 9:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भ्रष्ट लोकांची पार्टी म्हणत टीका केली होती. विशेष म्हणजे या टीकेनंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाले होते. त्यामुळे एकीकडे अजित पवार यांना भाजप सत्तेत सहभागी करुन घेतं, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी स्वत: राष्ट्रवादीवर टीका करतात. त्यावेळी याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाल्या होत्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत मोदींच्या टीकेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संबंधित आरोपांप्रकरणी मोदींनी कारवाई करावी किंवा माफी मागावी, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.

“नरेंद्र मोदी यांनी भाषणात राष्ट्रवादी ही भ्रष्ट लोकांची पार्टी आहे, असा शब्द त्यांनी वापरले. त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. माझं त्यांना आवाहन आहे की, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही आरोप करत आहेत. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई कराल. जर नसेल तर एका पक्षाच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य केलं तर माफी मागा”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांची मोदींवर टीका

“मोदींची पुतिनशी तुलना करण्याचा प्रश्न वेगळा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ज्या पद्धतीने तुरुंगात टाकलं, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने तुरुंगात टाकलं गेलं, हे असं होऊ शकत नाही, अशी माझी धारणा आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत चांगलं काम केलं, असं दिल्लीचे लोकं सांगतात. देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही आत टाकलं, याला काय म्हणायचं?”, अशी टीका शरद पवारांनी केली.

वर्चस्वाची लढाई म्हणून पक्ष फुटला?

यावेळी शरद पवार यांना वर्चस्वाच्या लढाईतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “वर्चस्वाच्या लढाईचा प्रश्न नाही. एजन्सीचे आमच्या काही सहकाऱ्यांसोबत चौकशीचे जे उद्योग सुरु होते, त्यामध्ये ते अस्वस्थ झाले. आमच्या काही सहकाऱ्यांच्या घरच्यांनी सांगितलं की, आम्हाला एकदाची गोळी घाला. यातून त्यांची अवस्था काय होती? हा प्रश्न होता.”

Non Stop LIVE Update
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.