Sharad Pawar Bihar Election Result : आम्हीही महाराष्ट्रात भोगलंय… बिहारच्या निवडणुकीचे निकाल येताच शरद पवार असं का म्हणाले?

Sharad Pawar Bihar Election Result : बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी बिहार निवडणूकीआधी महिलांना वाटलेल्या 10 हजार रुपयांच्या योजनेबाबत बोलताना निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर नेत आहे असे म्हटले आहे.

Sharad Pawar Bihar Election Result : आम्हीही महाराष्ट्रात भोगलंय... बिहारच्या निवडणुकीचे निकाल येताच शरद पवार असं का म्हणाले?
sharad-pawar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 15, 2025 | 12:26 PM

Sharad Pawar Bihar Election Result : बिहार विधानसभा निवडणूक 2025 निकालाने चित्र स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त) या महायुतीने महाआघाडीचा धुव्वा उडवला. भाजप या निवडणुकीत बिग ब्रदर ठरला आहे. तर जेडीयू दुसरी सर्वात मोठी पार्टी ठरली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. दरम्यान, ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांनी निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर नेत आहे असे म्हटले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना पैसा वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली असे म्हटले. “निवडणुकीपूर्वी १० हजार रुपये वाटप करणं हे एक प्रकारचं करप्शन आहे. आणि ते सरकारने केलं आहे. महाराष्ट्रातही तेच झालं होतं. त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी पैशाचं वाटप केलं होतं. आम्ही अजून काही ठरवलं नाही. कालच निकाल आला आहे. पण ही गोष्ट आम्ही डोळे झाक करणार नाही. काही दिवसात संसदेचं अधिवेशन सुरू होईल. तेव्हा विरोधकांची मिटिंग आम्ही बोलावू. त्यात आम्ही याबाबतचा विचार करू. ही गोष्ट सोपी नाहीये. सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते अधिकाराचा वापर पैसे वाटप करत आहे. निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर नेत आहे. त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही यावर चर्चा करून काही तरी करू. पैसा वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली. याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारच” असे शरद पवार म्हणाले.

शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले?

शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, हा शिवसेनेवर अन्याय आहे. त्यांना त्याची झळ बसत आहे. दोन तीन दिवसाचं हिअरिंग आहे. तिसऱ्यांदा पुढे ढकललं. ज्युडिशिअरीवर आपण बोलू शकत नाही. पण जे दिसतं ते योग्य नाही. पिपाणी चिन्ह हटवल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचं आभार मानतो.

निवडणुकीत युती करणार का?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करणार का याविषयी बोलताना शरद पावर म्हणाले की, “राज्यात पंचातय आणि नगरपरिषदेच्या निवडणुका येतील. पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या जातात. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही निर्णय घेतला की त्या तालुका आणि जिल्ह्यात पक्षाचे सहकारी आहेत त्यांनी निवडणुकीबाबतचा निर्णय घ्यावा.”