AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत, हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही – शरद पवार

Sharad Pawar : "भारताने स्वच्छा भूमिका घेतली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी या सगळ्यांनी आखाती देशातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन पाठिंबा दिला. आपण इस्रायलसोबत शेती संदर्भात संबंध ठेवले. पण राजकीय संबंध इस्रायलशी ठेवलेले नव्हते" असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत, हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही - शरद पवार
| Updated on: Jun 27, 2025 | 9:32 AM
Share

“वित्त विभागाने काय म्हटलय याची माहिती आलेली आहे. सरकारची बाजू ऐकायची म्हणतो, तेव्हा हे सुद्धा ऐकावं लागेल. पैसा लागेल, एवढा मोठा प्रोजेक्ट त्याच्यात किती यश येईल हे आज सांगता येणार नाही” असं शरद पवार शक्तीपाठी महामार्गाबद्दल बोलताना म्हणाले. हिंदी सक्तीच्या विषयावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावर सुद्धा शरद पवार व्यक्त झाले. “यात दोन भाग आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक तिथे हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. पाचवीपासून हिंदी येणं त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने हिताच आहे. आज देशामध्ये जवळपास 55 टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी 55 टक्के बोलली जात नाही. मराठी, कानडी, मल्याळम, बंगाली, ठराविक लोकसंख्या याचा आधार घेते म्हणून हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही” असं शरद पवार म्हणाले.

“साधारणत: महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत. पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे, त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लादणं योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्त्वाची आहे” असं शरद पवार यांनी सांगितलं. हिंदी सक्तीचा मुद्दा आत्ता समोर आणला, लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा सोडलाय का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, ‘लोक असं बोलतात, मला माहित नाही’

दोन्ही ठाकरेंच म्हणणं समजून घेणार

“मी दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली. मुंबईला गेल्यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेणार. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायच असेल, तर त्यांचं धोरण समजून घ्यावं लागेल” असं शरद पवार म्हणाले. मुंबई, उपनगरात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून हिंदी सक्ती केली जातेय असं ठाकरे बंधुंच म्हणणं आहे, त्यावर ‘मला माहित नाही’ असं उत्तर त्यांनी दिलं.

‘आपली मत लादणं योग्य नाही’

राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नरेंदर सरेंडर अशी टीका करतात त्याबद्दल पत्रकारांनी शरद पवार यांना त्यांची भूमिका विचारली. “जे काही झालं मध्यंतरी, अफगाणिस्तान, इस्रायल या सगळ्या गोष्टींवर ट्रम्पनी येऊन घोषणा केली. काही निर्णय झाले ते मी घतेले, कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नसताना ते सगळ श्रेय घेतात. कोणाशी बोलतात माहित नाही. त्यामुळे त्यांची विधानं अस्वस्थ करणारी आहेत. आज युरोप खंडात सुद्ध अनेक देश ट्रम्प यांच्या दृष्टीकोनाबद्दल नाराज आहेत. हा जो संपूर्ण बेल्ट आहे सौदी अरेबिया, कतर, अफगाणिस्तान, इराण असेल या सगळ्या बेल्टमध्ये अमेरिकेच्या भूमिकेबद्दल लोकांची नाराजी आहे. आपली मत लादणं योग्य नाही” असं शरद पवार म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.