शरद पवारांची काँग्रेसला धक्का देणारी चाल, नव्या खेळीचा कोणाला बसणार फटका?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, लवरच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो, आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

शरद पवारांची काँग्रेसला धक्का देणारी चाल, नव्या खेळीचा कोणाला बसणार फटका?
शरद पवार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2025 | 5:20 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकीनंतर आता लवकरच महापालिका निवडणुकीची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता सर्वच पक्षांनी पुढची रनणिती तयार करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची बातमी समोर येत आहे. मात्र मनसेसोबत युती नको अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला धक्का देणार विधान केलं आहे. मनसे महाविकास आघाडीमध्ये हवी असं शरद पवार यांचं मत आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसे महाविकास आघाडीमध्ये नको अशी सुरूवातीपासून काँग्रेसची भूमिका आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट मनसेसोबत युती कण्यासाठी आग्रही आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं शरद पवार यांची भेट घेतली,  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी मनसे महाविकास आघाडीमध्ये हवी असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील लढ्यात सर्व पक्ष सोबत मग निवडणुकीमध्ये का नको असा सवालही यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसची अडचण 

काँग्रेसने बिहार निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ला आहे, त्यामुळे सहाजिक आता इतर निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसची बार्गेनिंग पावर कमी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा काँग्रेस राज्यात मनसेसोबत युती करण्यास तयार नाहीये, मनसे युतीमध्ये नको अशी काँग्रेसची भूमिका आहे, तर दुसरीकडे मनसे महाविकास आघाडीमध्ये हवी, अशी भूमिका आता शरद पवार यांनी घेतली आहे.  मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीबाबत शरद पवार हे सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे,  आता काँग्रेस नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.