NCP Merger : होय 12 तारखेलाच…राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा सर्वात मोठा दावा, राजकारणात खळबळ!

आज तटकरे जे म्हणाले त्यात तथ्य आहे. 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार होते. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यामुळे हा निर्णय लांबला होता, असं सर्वात मोठं विधानही शशिकांत शिंदे यांनी केलं.

NCP Merger : होय 12 तारखेलाच...राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा सर्वात मोठा दावा, राजकारणात खळबळ!
ncp merger and ajit pawar and sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 2:36 PM

NCP Merger : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडलेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 5 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा नव्याने होत आहे. एकीकडे ही चर्चा होत असतानाच आता दुसरीकडे खासदार सुनिल तटकरे यांनीही विलिनीकरणावर मोठं विधान केलंय. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतात की काय, अशी चर्चा आता जोर धरू लागलीय. याच चर्चेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर राजकारण बदलू शकते

यावेळी बोलताना, अजितदादांची बारामतीला बैठक झाली होती. त्याअगोदरच जयंत पाटील यांच्या निवासस्थानीही एक बैठक झाली होती. त्याच बैठकीत विलिनीकरणाचा निर्णय झाला होता. अजितदादा हे दुरदृष्टी असलेले नेते होते. पवार साहेबांच्या बरोबर आम्ही अनेक वर्षांपासून काम करत आहोत. पवार सांहेबांच्या पक्षात तसेच अजितदादांच्या पक्षातही अनेक नेते आहेत. भविष्यकाळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर राजकारण बदलू शकते. सध्या राजकीय ताकद असणे गरजेचे आहे. राजकीय ताकद असल्याशिवाय राजकारणात कोणालाही किंमत नसते, असं महत्त्वाचं विधान शशिकांत शिंदे यांनी केलं.

Loading...

तर चित्र वेगळे असते

तसेच,त्याच वेळेला दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकरण झाले असते. परंतु दुर्दैवाने अजितदादा गेले. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झालेली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. अजितदादा गेले नसते तर अगदी कालच्या निवडणुकीत, जिल्हापरिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, पदविधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांत वेगळे चित्र दिसले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान

12 तारखेलाच विलिनीकरण होणार होते

आज तटकरे जे म्हणाले त्यात तथ्य आहे. 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार होते. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यामुळे हा निर्णय लांबला होता, असं सर्वात मोठं विधानही त्यांनी केलंय. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसात नेमकं का होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us