AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शीतल म्हात्रे video प्रकरणाचा मास्टर माइंड शोधून काढा, विधानसभेत महिला आमदार आक्रमक, काय घडलं?

Sheetal Mhatre Video | शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा व्हि़डिओ मॉर्फिंग प्रकरणात नेमकं कोण जबाबदार आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करा, यासाठी एसआयटी नेमा अशी मागणी आज विधानसभेत करण्यात आली.

शीतल म्हात्रे video प्रकरणाचा मास्टर माइंड शोधून काढा, विधानसभेत महिला आमदार आक्रमक, काय घडलं?
Image Credit source: सौ. विधानसभा
| Updated on: Mar 13, 2023 | 12:45 PM
Share

मुंबई | शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे पडसाद आज विधानसभेत उमटले. महिला आमदार यामिनी जाधव आणि मनिषा चौधरी आणि भारती लव्हेकर यांनी हा मुद्दा उलचून धरला.  विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते अजित पवारांच्या उपस्थितीत महिला आमदारांनी शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओ मॉर्फिंगमागे नेमका मास्टरमाइंड कोण आहे, त्याला शोधून काढा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. एका नगरसेविकेच्या बाबतीत हा गंभीर प्रकार घडला आहे. अशा मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य कायमचं बर्बाद होऊ शकतं, असा इशारा महिला आमदारांनी दिला. इतकच नाही तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणीही आमदार भारती लव्हेकर यांनी केली.  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील या प्रकरणाची चौकशी करून वास्तव समोर आणावं, अशी भूमिका मांडली.

यामिनी जाधव आक्रमक

विधानसभेत आमदार यामिनी जाधव यांनी शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. त्या म्हणाल्या, ‘ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका रॅलीची क्लिप फिरतेय. मॉर्फिंग होतं यावरून चौकशी केली पाहिजे. एका प्रतिष्ठित महिलेच्या बाबतीत, माजी नगरसेवकाच्या बाबतीत हे घडंतय. तिने किती वेळा समोर येऊन साबित करायचं की मी चुकीची नाही. याच्यावर कधी कारवाई होणार, मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ज्यानी कुणी केलंय, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे….

महिलेचा संसार उध्वस्त होऊ शकतं- मनिषा चौधरी

आमदार मनिषा चौधरी यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला. इकडे – पुरुष आमदारही इथे आहेत. एका आमदारासोबत कार्यकर्तीचा व्हिडिओ मॉर्फिंग करून तो व्हायरल केला ही अतिशय निंदनीय बाब आहे. दोन दिवसांपूर्वी महिला दिन साजरा केला. चांदीच्या ताटात जेवायला दिलं. जो प्रकार व्हायरल केलाय. पहिला व्हिडिओ कुणी मॉर्फ केला, त्याला शोधून काढावं. आज एका आमदार आणि महिलेवर झालंय, उद्या ही पाळी तुमच्यावरही येऊ शकते. कारण कोणताही माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे त्या व्हिडिओत बघितलंय. त्या उद्घाटनाला मीही हजर होते. तो व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल करायचा. एखादा डोकेफिरू नवरा असेल तर त्या महिलेचा संसार क्षणात उध्वस्त होऊ शकतो. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, अशी मागणी मनिषा चौधरी यांनी केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

आणि शिंदे समर्थक शिवसेना नेत्या, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एका रॅलीतील व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरून सर्वप्रथम हा व्हिडिओ शेअर केल्याचं म्हटलं जातंय. या व्हिडिओत एका रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आमदार प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे दिसतात. त्यातील दृश्य आक्षेपार्ह असून व्हिडिओ मॉर्फिंग केल्याचं म्हटलं जातंय. राजकीय शत्रुत्वातून बदनामी करण्याचा हा कट असल्याचे आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहेत.

अजित दादांचं उत्तर काय?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, राजकारणात चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. पब्लिक फिगर म्हणून लोक आमच्याकडे पाहत असतात. कोणत्याही लोकप्रतिनिधीनं काही केलं नसताना जाणीवपूर्वक कुणी ते करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न असेल तर दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे. वस्तुस्थिती समोर आली पाहिजे…

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.