AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साईबाबांच्या शिर्डीतील अख्खं विमानतळ होणार जप्त? नोटीस पाठवली, काय आहे प्रकरण?

shirdi international airport: विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा झाली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस पाठवली आहे. विमातळाची टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे.

साईबाबांच्या शिर्डीतील अख्खं विमानतळ होणार जप्त? नोटीस पाठवली, काय आहे प्रकरण?
shirdi international airport
| Updated on: Aug 09, 2024 | 1:32 PM
Share

शिर्डी येथील साईबाबा देवस्थान देशभर प्रसिद्ध झाले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान शिर्डी आहे. यामुळे शिर्डीत देशभरातून भाविक येत असतात. त्यासाठी शिर्डी सारख्या छोट्या शहराचा विकास चांगला करण्यात आला. रेल्वे स्टेशन आणि विमानतळ सुरु करण्यात आले. त्याच शिर्डीतील विमानतळाला आता नोटीस देण्यात आली आहे. आठ कोटी तीस लाखांचा कर थकल्या प्रकरणात शिर्डी विमानतळाला ही नोटीस शिर्डी ग्रामपंचायतीने बजावली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही नोटीस बजावल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

8 कोटी 30 लाखांचा कर थकवला

शिर्डी विमानतळ हे कोपरगाव तालुक्यातील काकडी – मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. विमानतळ प्राधिकारणाने काकडी ग्रामपंचायतचा 8 कोटी 30 लाखांचा कर थकवला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले आहे. 2017 पासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरुपातील कर थकीत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही थकबाकी जमा होत नाही. यामुळे ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे.

ग्रामपंचायतीच्या विकासात अडथळे

शिर्डी विमानतळाची उभारणी करताना गावातील हजारो हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. त्यावेळी काकडी गावात पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाठी निधी देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने दिले होते. मात्र या सर्व आश्वसनांची पुर्तता झाली नाही. त्यातच ग्रामपंचायतीचा 8 कोटी 30 लाखांचा कर प्राधिकरणाने थकवला आहे. कर थकल्याने गावातील विकासाला अडथळे निर्माण होत असल्यामुळे हे पाऊल उचलले आहे.

काय काय होणार जप्त

विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा झाली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस पाठवली आहे. विमातळाची टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे. कर जमा न केल्यास आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचा इशारा सरपंच पूर्वी गुंजाळ आणि उपसरंपच भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.